Breaking News

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे विधिमंडळ पक्षनेते तर विजय वडेट्टीवार गटनेते

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोण असा प्रश्न चर्चिला जात होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी काँग्रेसने वर्णी लावली. तर सभागृहातील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांची सभागृहाच्या नेते पदी निवड करण्यात आली आहे.
विखे-पाटील यांनी स्वतःचा मुलगा सुजय विखे-पाटील याला अहमदनगरमधून तिकिट मिळावे म्हणून प्रयत्न केले. मात्र पक्षाने त्यांना तिकिट नाकारल्याने सुजय यांनी भाजपात प्रवेश करत लोकसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील हे ही भाजपात जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. त्यांनी अद्याप भाजपात प्रवेश केलेला नसला तरी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिला.
त्यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसकडून नव्या नेत्याचा शोध घेण्यात येत होता. लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत विखे-पाटील यांनी भाजपा-शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार केला. तर थोरात यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचे रान केले. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना विधिमंडळाचे नेते पद बहाल करण्यात आल्याचे काँग्रेसमधील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
याचबरोबर नसीम खान यांची उपनेते पदी, बसवराज पाटील यांच्याकडे मुख्य प्रतोद पद, प्रतोद म्हणून के.सी.पाडवी, सुनील केदार, जयकुमार गोरे, यशोमती ठाकूर आणि प्रणिती शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच विधान परिषदेत शरद रणपिसे हे गटनेते म्हणून राहणार आहेत. उपनेते पदी रामहरी रूपनवार आणि प्रतोद म्हणून भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *