Breaking News

Tag Archives: vijay vadettiwar

मुंबईतील जीर्णावस्थेतील इमारतींचे पुनर्वसन तातडीने करावे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी सर करीमभाई इब्राहीम ट्रस्ट या निर्वासित मालमत्तेमधील कुलाबा चेंबर्स आणि मेहबुब इमारत या दोन्ही इमारतींची अवस्था जीर्ण असून, तातडीने या इमारतींमधील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात यावे. इमारत पुनर्बांधणीसाठी सल्लागार नेमुन अहवाल सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयात मुंबई शहरातील सर करीमभाई इब्राहिम …

Read More »

पूरग्रस्तांची थट्टा थांबवा, सरसकट सर्वांना मदत द्या पूरग्रस्त कोल्हापूर, सातारा भागाला विरोधी पक्षनेते वडेट्टीवार आणि थोरात यांची भेट

कराड: प्रतिनिधी कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील पूरग्रस्तांना तातडीने सर्व प्रकारची मदत करण्यात सरकार अपयशी ठरले असताना दुसरीकडे या पूरग्रस्तांची सरकारने क्रूर थट्टा केली आहे. दोन दिवस पाण्यात बुडालेल्यांनाच सरकारी मदत देण्याचा शासन आदेश काढून पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असा घणाघाती आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. …

Read More »

पीक विमा भरण्यास एक महिन्याची मुदतवाढ द्या धानाची रोपे (पऱ्हे) टाकल्यापासूनच पिक विमा लागू करण्याची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई: प्रतिनिधी खरीप हंगामातील पिक विमा भरण्यापासून राज्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत, हे लक्षात घेता शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी पिक विमा भरण्यासाठी एक महिन्याची मुदत वाढ देण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील खरीप हंगामाच्या पेरण्या समाधानकारक पावसाअभावी अनेक भागात कमी प्रमाणात झालेल्या आहेत. मराठवाडा, विदर्भात हा …

Read More »

सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षांचा निर्णय फडणवीस सरकार म्हणजे 'आभासी' सरकार - धनंजय मुंडे

मुंबईः प्रतिनिधी या सरकारने पाच वर्षांत ठोस काम केलेले नाही. फडणवीसांचे हे आभासी सरकार असल्याचा थेट आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. १७ जून दुष्काळ दिन साजरा केला जातो. त्याच दिवशी या सरकारने दुष्काळाकडे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे त्याच दिवशी पावसाळी अधिवेशन सुरु होत असून या …

Read More »

बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे विधिमंडळ पक्षनेते तर विजय वडेट्टीवार गटनेते

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभेचे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या ठिकाणी कोण असा प्रश्न चर्चिला जात होता. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील विखे-पाटील यांचे प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाणारे बाळासाहेब थोरात यांची विधिमंडळ पक्षनेते पदी काँग्रेसने वर्णी लावली. तर सभागृहातील उपनेते असलेले विजय वडेट्टीवार यांची सभागृहाच्या नेते पदी निवड करण्यात आली …

Read More »

विजय वडेट्टीवार विधानसभेतील नवे विरोधी पक्षनेते ? राज्यातील चवथ्या टप्प्यातील मतदानानंतर नाव जाहीर होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी विधानसभेतील राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्विकारल्यानंतर विरोधी पक्षनेते पदी नव्या व्यक्तीची निवड करण्याच्या हालचालींना काँग्रेसमध्ये वेग आला आहे. विरोधी पक्षनेते पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार यावरून अनेकांमध्ये उत्सुकता असली तरी या पदाची माळ विदर्भातील काँग्रेसचे आमदार आणि सभागृहातील उपगटनेते विजय …

Read More »

जनावरांच्या लसप्रश्नी विरोधकांचा सभात्याग पदुम मंत्री महादेव जानकर असमाधानकारक उत्तर दिल्याचा विरोधकांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील २कोटी १० लाख शेतीपयोगी जनावरांना लाळ-खुरकूत रोग होवू नये यासाठी लस देण्यासाठी राज्य सरकार चालढकल करत आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याप्रश्नी पशु व दुग्ध संवर्धन मंत्री महादेव जानकर हे प्रश्नांशी संबधित नसलेली उत्तर देत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी करत सभात्याग …

Read More »