Breaking News

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिले “हे” आदेश विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणण्यामागे एकादी शक्ती असावी

मराठी ई-बातम्या टीम

आज दिवसभरात मुंबईसह राज्यातील नागपूर, उस्मानाबाद आणि औरंगाबादेत १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. तसेच या दोन्ही वर्गाच्या परिक्षा ऑनलाई घ्या किंवा परिक्षा रद्द करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. अचानक विद्यार्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येण्यामागे नेमका व्यक्ती कोण असा प्रश्न राज्य सरकारबरोबर पोलिस प्रशासनाला पडला होता. त्यामुळे विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत अखेर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देत योग्य ती कारवाई केली जाईल आश्वासन दिले.

दिवसभरातील घडलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर अखेर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एका व्हिडिओद्वारे सदरची माहिती दिली.

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशयही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आले असून मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *