Breaking News

अजित पवार म्हणाले, जल्लोष करणारे आंदोलक कर्मचारी नंतर सिल्व्हर ओकवर का? बरंच काही ऐकायला आलंय पण त्याबाबत बोलणे योग्य नाही

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रश्न अंतिम निकाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी काही एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाबोल करत चपला आणि दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शरद पवारांचे पुतणे तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणा मागचा मास्टरमाईंड शोधून काढू असा इशारा देत यासंपूर्ण घटनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

आंदोलकांना चिथावल्याप्रकरणी गांवदेवी पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांना रात्री सुरुवातीला ताब्यात घेतले. त्यानंतर रात्री अटक करण्यात आली. आज आंदोलनकर्त्ये हल्ला करणारे १०७ एसटी कर्मचारी आणि सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

आधी जल्लोष करणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी नंतर सिल्व्हर ओकवर का धाव घेतली? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करत म्हणाले की, मला एका गोष्टीची गंमत वाटते. उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर तिथे गुलाल उधळला गेला. तिथे मिठाई वाटली गेली. खूप मोठे यश मिळवले असे दाखवले गेले. मग एवढं सगळं होत असताना पुन्हा सिल्व्हर ओकवर जाण्याचं काहीच कारण नव्हतं. त्याच्या पाठिमागचं कारण काय? त्यातल्या एकानं म्हटलंय की १२ तारखेला बारामतीला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कालच्या घटनेबाबत खूप काही माझ्या कानावर आलंय, असा दावाही त्यांनी यावेळी करत पण त्याबाबत वास्तव परिस्थिती समोर आल्याशिवाय आम्ही बोलणं योग्य ठरणार नाही. जे कुणी आले होते, ते सगळे सुस्थितीत होते, अशातला भाग नाही. काही वेगळ्या गोष्टी देखील तिथे घडत होत्या असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आंदोलकांनी चर्चेसाठी तिथे जायची गरजच नव्हती, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडत सुप्रिया सुळे तिथे सगळ्यांना हात जोडून विनंती करत होत्या. ही आपलीच माणसं आहेत असे मानून त्यांची चर्चा करण्याची तयारी होती. खरंतर आंदोलकांनी तिथे जाऊन ही चर्चा करण्याचे काहीच कारण नव्हतं. चर्चा मंत्रालयात देखील होऊ शकते. पण तुम्ही एकीकडे गुलाल उधळता आणि नंतर मात्र असं टोकाचं वागण्याचा प्रयत्न करता. हे निश्चितपणे कळलं पाहिजे की याच्या पाठिमागे कोणकोण आहे. पोलीस हे सगळं पाहतील असेही त्यांनी सांगितले.

आपला कुणाचा त्यांना विरोध असण्याचं कारणच नाहीये. न्यायालयानं दिलेला निर्णय सर्वोच्च असतो. आम्ही तर ठरवलेलं १ तारखेनंतर कारवाई करायची. पण न्यायालयानं २२ तारखेपर्यंतची मुदत दिली. तेही आम्ही मान्य केलं. कुठेही सरकारने त्यात आडमुठेपणाची भूमिका घेतली नाही. सातव्या वेतन आयोगाच्या बरोबरीने वेतनाची रक्कम देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. १० तारखेला पगार वेळेत होण्यासाठी राज्य सरकार हस्तक्षेप करेल असेही सांगितले. आसपासच्या राज्यांच्या बरोबरीने पगार आणण्याचा प्रयत्न झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *