Breaking News

फडणवीसांनंतर केशव उपाध्ये आणि उर्मिला मातोंडकरांमध्ये “शब्द युध्द” केशव उपाध्ये आणि उर्मिला मातोंडकरांमध्ये ट्विटरवरच रंगली चकमक

मराठी ई-बातम्या टीम

भाजपा आमदारांच्या निलंबनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या अनुषंगाने फडणवीसांच्या टीकेला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी उत्तर दिल्यानंतर भाजपाचे केशव उपाध्ये यांनी मातोंडकर यांना वडाची साल पिंपळाला लावू नका असा सल्ला देत तुमच्या आमदारकीच्या प्रश्नी न्यायालयाने अद्याप काही सांगितले नसल्याचे ट्विट करत मातोंडकरांच्या मर्मावर बोट ठेवण्याचा प्रयत्न ट्विटद्वारे ठेवण्याचा प्रयत्न केला.

परंतु शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी केशव उपाध्ये यांच्या या खोचक टीकेला तितक्याच खोचकपणे उत्तर देत म्हणाल्या की आपला तो बाब्या हे बरोबर असल्याचे खोचक टोला लगावत जळफळाट, जळजळ, तळमळ आदी कोणत्या पक्षाशी संबधित आहेत हे साऱ्या महाराष्ट्राला माहित असल्याचे सांगत निरूत्तर करण्याचा प्रयत्न केला.

उर्मिला मातोंडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उर्मिला मातोंडकरांवर निशाणा साधत “थोडी माहिती घ्या. आपलं वाचन चांगल आहे असं ऐकून आहे. दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत. उगाच वडाची साल पिंपळाला लाऊ नका. आमदारांना सर्व कायदे नियम धाब्यावर बसवून निलंबित करण्यात आले होते. राहिला तुमच्या आमदाकीचा विषय, तर त्यासाठी लोक न्यायालयात गेली होती, पण न्यायालयाने काही सांगितलं नाही.”

त्यांच्या या ट्विटला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “अर्थातच विषय पुर्णतः वेगळे आहेत म्हणूनच “आनंद/अभिनंदन”. पण प्रश्न मात्र महाराष्ट्राच्या जनतेच्या हक्कांचा आहे आणि लोकशाहीचा तर आहेच आहे. त्यामुळे “वडाची साल” ऐवजी “आपला तो बाब्या” जास्त बरोबर आहे. माझ्या आमदारकीची चिंता नसावी. त्याने माझे काम थांबलेले नाही.

त्यांच्या या प्रतिक्रियेवर केशव उपाध्ये म्हणाले, “आपली जळजळ, तळमळ ही केवळ ‘आमदारकी’साठीच आहे, हे आपल्या ट्विटवरून लक्षात येतेच. महाराष्ट्रात एवढे गंभीर विषय घडत असताना, आपण त्यावर फारसे भाष्य केलेले दिसत नाही. पण आमदारकीचा विषय आला, की आपल्यातील ‘प्रतिक्रियावादी’ भूमिका सगळे काही स्पष्ट करते. बाकी आमदारकीसाठी शुभेच्छा.”

उपाध्ये यांच्या या टीकेवर उर्मिला मातोंडकर यांनी पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावत म्हणाल्या की “गेली २ वर्ष “जळजळ,तळमळ” आणि “जळफळाट” हे शब्द कुठल्या पक्षाशी संबंधित आहेत हे महाराष्ट्राच्या सुज्ञ जनतेला माहित आहे. मुद्दा सोडून बोलण्यात तथ्य नसतं. मुद्दा लोकशाहीचा, लोकहिताचा आहे. बाकी माझ्या जळजळीकरता अँटासिड (Antacid) आहे. आपण आपला विचार करा” असा खोचक टोलाही लगावला.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *