Breaking News

मी अध्यक्ष असताना न्यायालयाचे निर्णय विधानभवनात लागू न होण्याबाबत ठराव केला फडणवीसांच्या काळात तर रेशन दुकानात बिअर शॉपीचा निर्णय, ते औषध कोल्हापूरला जायला हवं

मराठी ई-बातम्या टीम

भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, मी विधानसभा अध्यक्ष असताना एकमताने ठराव संमत केला की इतर उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय हे विधिमंडळाच्या आवारात लागू होऊ देणार नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जरी निर्णय दिलेला असला तरी तो विधान भवन आवारात लागू हो‌वू शकेल असे वाटत नसल्याचे सांगितले.

मी विधानसभा अध्यक्ष असतो तर काय केलं असतं हे देशाला दिसलं असतं. संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

नितीन राऊत काल प्रभारी यांना भेटायला आले होते, परंतु बैठकीला ते न थांबता लगेच गेल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांचा कोणताही नाराजीचा सूर अमच्याविरोधात नव्हता असे स्पष्ट सांगत काँग्रेसतंर्गत असलेल्या नाराजी नाट्यावर अधिक बोलण्याचे टाळले. मोदी नावाच्या गावगुंडा बद्दल मी बोललो आहे, भाजपवाल्यांना काय आदळ आपट करायची ती करूदे, कोर्टात तक्रारी करू द्या कोर्ट जो निर्णय देईल त्याचा आदर राखू असेही ते म्हणाले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वेडेपणा कमी होण्यावरील औषध पाठविल्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, चंद्रकांत पाटलांचे औषध चुकीच्या पत्त्यावर गेलंय, ते कोल्हापूरला गेलं पाहिजे होतं असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावत निवडणूक जवळ येते तेव्हा भाजपाकडून हिंदू मुस्लिम वाद वाढवण्याचे काम केले जाते. भाजपा सरकारच्या काळात ५३ टक्के बेरोजगारी वाढली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

फडणवीसांच्या सरकारमध्ये निर्णय घेतले गेले होते, बियर शॉपी रेशनच्या दुकानात सुरू करणं असो वा राज्यात डान्सबार सुरू करणं असो हे ही निर्णय त्यांच्या काळात घेतले गेले. मागच्या वेळेस जे निर्णय घेतले होते, तेव्हा असेच निर्णय घेतले गेले होते का? तेव्हाही अर्थपूर्ण निर्णय घेतले गेले असा खोचक टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.

अनेक पक्षांनी घोषणा केल्या आहेत. ज्या काही निवडणुका झाल्यात त्यात अनेक पक्षांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेस डिजिटल मेम्बर शिप करणार कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांना काँग्रेस चा विचार सांगणार आणि सदस्य करून घेणार. बोगस नाही. Misscall देऊन जगातला मोठा पक्ष व्हायचं नसल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

अखेर भाजपाचा “संकल्प पत्र” जाहिरनामा प्रसिध्द

देशातील प्रमुख राष्ट्रीयस्तरावरील पक्षांकडून लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकृष्ट करण्यासाठी जाहिरनामा प्रसिध्द केला. आतापर्यंत मार्क्सवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *