Breaking News

शिवसेनाप्रमुखांच्या नातूचे प्रेरणास्थान इग्लंडचे माजी पंतप्रधान शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची ट्वीटवरून माहिती

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्रासह देशातील राजकिय पटलावर आपल्या वकृत्वशैलीमुळे जरब  बसविणारे आणि राज्यातील तमाम सर्वसामान्य शिवसैनिकांचे आराध्य दैवत असलेले शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा दरारा सर्वत्र होता. त्यांच्या या कार्यशैलीतून प्रेरणा घेत अनेकांनी बाळासाहेबांप्रमाणे स्वत:ला राजकारणात स्थापित करण्याचा प्रयत्न केला. परंतु स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नातू अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी चिरंजीव शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी मात्र स्वत:चे प्रेरणास्थान म्हणून इंग्लडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर हे प्रेरणास्थानी असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या एका इशाराऱ्यावर दिवसरात्र धावणारी मुंबई एका हाकेत थांबायची. तर निवडणूकीच्या आखाड्यात त्यांनी केलेल्या टीकेला आशीर्वाद मानला जात असे. विशेषत: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात तर स्व. बाळासाहेब कोणाकोणाला टीकेचे फटकारे ओढतात याकडे साऱ्यांचे लक्ष असायचे. याशिवाय आपल्या अतुलनीय वकृत्वाच्या जोरावर लाखो-करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. त्यामुळे महाराष्ट्राबरोबरच देशातील अनेक राज्यात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची क्रेज, उत्सुकता नेहमीच राहिली आहे. त्यामुळे अनेकांनी त्यांना प्रेरणास्थानी मानून जिल्ह्याच्या राजकारणात तर कधी प्रांताच्या राजकारणात स्वत:ला सिध्द करण्याचा प्रयत्न केल्याचे मत शिवसेनेतील एका नेत्याने व्यक्त केले.

ज्या व्यक्तीकडे संबध देशभरातील राजकिय नेते प्रेरणास्थान, मार्गदर्शक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पहात आले आहेत. त्यांचाच नातू स्वत:चे प्रेरणास्थान म्हणून देशातील नव्हे तर इंग्लडच्या माजी पंतप्रधानाकडे पहात असल्याचे त्यांनीच जाहीर केल्याने आता बाळासाहेबांची, उध्दव ठाकरेंची शिवसेना संपून वेगळीच शिवसेना भविष्यात पाह्यला मिळणार असल्याची ही चाहूल असल्याचे दिसून येत असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केल.

सध्या टोनी ब्लेअर व त्यांच्या पत्नी हे रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानीच्या मुलाच्या लग्नासाठी मुंबईत आलेले आहेत. हीच संधी साधत आदीत्य ठाकरे यांनी टोनी ब्लेअर यांची भेट घेत त्यांच्याबरोबर फोटोशेसन करत त्याचे फोटोही व्हायरल केले.

In your profession, you choose an inspiration. This is my only fan boy moment ever. I’m sure I freaked him out within seconds of my conversation with him, telling him how much of an inspiration he is to me, personally, and how the world still needs leaders like him.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *