Breaking News

अजित पवारांच्या स्पष्टोक्तीनंतर जयंत पाटील यांचे मोठे वक्तव्य, पुढचा मुख्यमंत्री ठरला… आमचा पक्ष महाविकास आघाडीत मोठा

काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याची आणि राज्याच्या नेतृत्वबदलाची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली. त्यातच एका जाहिर कार्यक्रमात अजित पवार यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी बसायला आवडेल का असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनीही नक्कीच मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी जाहिर स्पष्टोक्ती दिली. त्यानंतर राज्यात अजित पवार यांचे राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून लावण्यात येऊ लागले. याची चर्चाही चांगलीच रंगू लागल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले.

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सध्या महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यभरातील जनतेचा मोठा पाठिंबा मिळत आहे. समाधान याचं आहे की, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे.

जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा होणार आहे. हे आता जवळपास सर्वांनी मान्य केलं आहे. तेवढ्या वेगाने आमचा पक्ष पुढे जात आहे. म्हणून मला खात्री आहे की, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भविष्यात राज्यातला सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल.

राज्यात भारतीय जनता पार्टी हा सर्वात मोठा पक्ष आहे. परंतु २०१९ च्या निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले आणि त्यांनी महाविकास आघाडी स्थापन करून राज्यात सत्ता स्थापन केली. महाविकास आघाडीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. शिवसेनेकडे ५६, राष्ट्रवादी काँग्रेसचे ५४ आणि काँग्रेसचे ४४ आमदार होते. परंतु आता शिवसेनेचे ४० आमदार फुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस हा महाविकास आघाडीतला मोठा पक्ष आहे.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *