Breaking News

निर्मल नगर रहिवाशांनी विकासकाला दिली १५ दिवसाची मुदत अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

मुंबईः प्रतिनिधी
निर्मल नगर येथील पुर्नविकास प्रकल्पात विकासकाकडून मनमानी करण्यात येत आहे. मागील ३ वर्षापासून येथील १८०० रहिवाशांना विकासकाने भाडेही दिलेले नाही. पुढील १५ दिवसात विकासक सेजल सिध्दा बिल्डरने रहिवाशांचे थकित भाडे आणि पुर्नविकासाचे काम लवकर मार्गी न लावल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा ऑल्वीन युथ फाँऊडेशनचे संस्थापक ऑल्वीन दास यांनी दिला.
विकासकाच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात प्रकल्पाच्या विरोधात ऑल्वीन युथ फाँऊडेशनच्यावतीने आज निदर्शने करण्यात आली. त्यावेळी हा इशारा देण्यात आला.
पुर्नविकास प्रकल्पाचे काम सेजल सिध्दा बिल्डरला देण्यात आले. या बिल्डरबरोबर झालेल्या करारानुसार प्रकल्प पूर्ण होईपर्यंत १८०० रहिवाशांना घर भाडे देण्याचे कबुल करण्यात आले. परंतु आज तीन वर्षे झाली रहिवाशांना भाडेच बिल्डरकडून दिले जात नाही. तसेच रहिवाशांनी बिल्डरकडे याचा जाब विचारला तर टाळाटाळ करत असून प्रसंगी गुंडाकडून या रहिवाशांना धमकाविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.
जर येत्या १५ दिवसांमध्ये सदर प्रकल्पग्रस्त घर-मालक रहिवाशांना त्याचे ३ वर्षाचे स्थगित घरभाडे मिळाले नाही तर छेडलेले हे आंदोलन आणखी उग्र करण्यात येणार आहे. तसेच सेजल-सिद्धा बिल्डरला १५ दिवसाची मुदत देत आहोत. या १५ दिवसात १८०० रहिवाशांना स्थगित भाडे न दिल्यास आम्ही पुढील कायदेशीर कार्यवाही करणार असून त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जाणार असून त्यास बिल्डर सेजल सिध्दा जबाबदार राहिल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Check Also

पियुष गोयल यांच्या विरोधात बातमी छापल्याने पत्रकाराला धमकी

मुंबई उत्तर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या “गोयल यांना सोसवेना मासळीचा वास” …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *