Breaking News

मुंबईकरांसाठी मोठी बातमी: ८० रिक्षा आणि १७ टॅक्सी मार्गासाठी प्रवाशी भाडे जाहीर नमुद भाडे दरापेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे तक्रार करण्याचे आवाहन

ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करण्यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या योजना परिवहन विभागामार्फत राबविण्यात येतात. ऑटोरिक्षा व टॅक्सीने प्रवास करताना शेअरिंग पद्धतीने सेवेचा लाभ घेतल्यास प्रतीप्रवासी देय भाडे भाड्यापेक्षा मीटरप्रमाणे देय होणारे भाडे हे कमी असते. मुंबईतील विविध भागातील प्रवाशांना या योजनेचा लाभ घेण्याकरीता प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील शेअर-ए-ऑटोरिक्षांच्या ८० मार्गांना व शेअर-ए-टॅक्सींच्या १७ मार्गांना मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेचा लाभ घेणाऱ्या जनतेला या प्रसिद्धीपत्रकामार्फत या दरांबाबत अवगत करण्यत येत असून संबंधित मार्गिकेसाठी ठरवून दिल्याप्रमाणेच प्रतीप्रवासी भाडे अदा करावे. तसेच शेअरिंग योजनेचा लाभ घेताना नमूद भाडे दरापेक्षा जादा भाडे आकारणी केल्यास प्रवासाचा तपशील व वाहन क्रमांकासह कार्यालयाकडे तक्रार करावी, तसेच जनतेनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आवाहन सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत केले आहे.

शेअर-ए-ऑटोरिक्षा व शेअर-ए-टॅक्सी या योजनेतून प्रवास करण्यासाठी मान्यताप्राप्त स्टँड यादी व त्या-त्या मार्गावर प्रतीप्रवासी किती भाडे देय आहे याची यादी सोबत जोडण्यात आली आहे . असे सचिव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई (पश्चिम) यांनी प्रसिद्धीपत्रकामार्फत कळविले आहे.

आरटीओने जारी केलेल्या या मार्गावर हेच प्रवासी भाडे असणार: 

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *