Breaking News

मुंबई महानगरात वाढत्या लोकसंख्येबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास पर्यावरण विभागाच्या अंदाजपत्रकात भीती

मुंबई : प्रतिनिधी

देशासह राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि महानगरात वर्षागणिक एकूण राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात ४. ७ टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे या वाढत्या लोकसंख्येमुळे मुंबई महानगरातील पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने ऱ्हास होत असल्याची भीती पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अंदाज पत्रकात व्यक्त करण्यात आली आहे.

महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास ४५ नागरी लोकसंख्या मुंबई महानगरात राहते. तरीही वर्षाकाठी ४.७ टक्क्यांची त्यात भरच पडत आहे.  मुंबईसह महानगरात असलेल्या नद्या, समुद्र किनारे, तिवरांची जंगले याची मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याचे बाब अहवाल नमूद करण्यात आली आहे.

मुंबईसह महानगरात वाहणाऱ्या नद्यांमध्ये या परिसरात असणाऱ्या कंपन्यांकडून रासायनिक युक्त पुर्नवापर केलेले पाणी सोडले जात आहे. या पाण्यावर पुर्नप्रकिया करण्यासाठी तारापूर, बदलापूर या भागात सांडपाणी, संयंत्रणा उभारण्यात आलेली असली तरीही या नद्यामधून मोठ्या प्रमाणावर प्रदुषण युक्त पाणी वहात आहे. याशिवाय निवासी वापरांकरीता जमिनींची नव्याने निर्मिती करण्यासाठी तिवरांची जंगले तोडून त्या ठिकाणी भराव टाकून जमिन तयार करण्यात येत असल्याने पर्यावरणीय ऱ्हास होत आहे. त्याचबरोबर वृक्षांची लागवड करण्याची गरज असल्याची माहिती प्रदुषण मंडळातील एका उच्च पदस्थ नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्याने दिली.

याशिवाय महानगरातील मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील, नवी मुंबईतील हवेतही मोठ्या प्रमाणावर प्रदुषण असल्याचे आढळून आले असून हे प्रदुषण कमी करण्यासाठी मुंबईतील १० ठिकाणी, नवी मुंबईत २, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली परिसरात प्रत्येकी एक हवा गुणवत्ता संनियंत्रण उभारण्यात येणार आहे. तर मुंबईत बसविण्यात आलेली २५ वायु केंद्र या वर्षभरात पूर्ण कार्यक्षमतेने कार्यरत होणार असल्याचे अहवाल सांगण्यात आले आहे.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *