Breaking News

राज्यपालांनी आता प्र.कुलगुरू- परिक्षा नियंत्रक आणि कुलसचिवांची नियुक्ती करावी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. तसेच त्याच्या फटका अनेक विद्यार्थ्यांना बसू लागल्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना कुलगुरू पदावरून हटवित नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केल्याबद्दल राज्यपालांचे आभार मानत आता विद्यापीठाच्या प्र.कुलगुरु-परिक्षा नियंत्रक, कुलसचिव पदीही नव्याने नियुक्ती करावी अशी मागणी करत उपकेंद्रामध्ये सुरु असलेला गोंधळही आवरावा अशी मागणी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी एका जाहीर प्रसिध्दी पत्रकान्वये राज्यपालांकडे केली.

यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांचे अभिनंदन केले.

युवासेनेने केलेल्या आंदोलनानंतर, या आधीच्या कुलगुरूंना हटवण्यात आले होते. नव नियुक्त कुलगुरू यांच्यावर जबाबदारी मोठी आहे, विद्यापीठाचा भोंगळ कारभार आवरण्याची. चांगल्या कामांसाठी युवासेना त्यांच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासनही त्यांनी दिले.

तसेच विद्यापीठाच्या कारभारावर देखील आमची नजर असणारच असे सांगत आज जसे कुलगुरू नियुक्त झाले, तसेच लवकरात लवकर प्र. कुलगुरू परिक्षा नियंत्रक (Pro VC, Controller of Examination) आणि कुलसचिव (Registrar) आदींची नियुक्ती करावी अशी मागणी करत  उपकेंद्रामधील (sub centers) चा गोंधळ आवरावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *