Breaking News

पन्हाळा किल्ल्याची लढाई पाह्यला मिळणार १ जूनला ‘फर्जंद’मध्ये जिजाऊंच्या मनातील स्वराज्याची संकल्पना

मुंबई : प्रतिनिधी

हिंदवी स्वराज्याचे राजे जरी छत्रपती शिवाजी महाराज असले तरी त्याची मूळ संकल्पना राजमाता जिजाऊंची आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. शिवरायांनी जिजाऊंच्या कल्पनेतील स्वराज्य निर्मण केलं. या कामी त्यांना अनेक मावळ्यांची साथ लाभली. असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती स्वराज्याच्या यज्ञकुंडात दिली. याचीच प्रचिती आता ‘फर्जंद’ या सिनेमाच्या निमित्ताने येणार आहे.

‘फर्जंद’चं नवं पोस्टर नुकतंच रिव्हील करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये शिखरावर सिनेमाचा नायक कोंडाजी फर्जंद शिखरावर आहे. या पोस्टरचं डिझाइन एखाद्या वटवृक्षासारखं करण्यात आहे. या वटवृक्षाच्या मूळाशी म्हणजेच स्वराज्याच्या संकल्पनेच्या मूळाशी जिजाऊ आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्कम आधार या वटवृक्षाला लाभला आहे. या वटवृक्षाच्या फांद्या म्हणजे शिवरायांचे मावळे आहेत. या सर्वांना स्फूर्ती आणि शक्ती प्रदान करणारी महाराष्ट्राची कुलदेवता भवानीमाता अशी या पोस्टरची संकल्पना आहे. हे पोस्टर सिनेमाचा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर याच्या संकल्पनेतून आकाराला आलं आहे.

या चित्रपटातून शिवकालीन लढाई आपल्यासमोर येणार आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी कोंडाजी फर्जंद या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर कशी यशस्वी चढाई केली त्याचा रोमांचकारी इतिहास ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे उलगडणार आहे. कोंडाजी फर्जंदची व्यक्तिरेखा अंकित मोहनने साकारली असून, त्याच्या जोडीला चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, हरीश दुधाडे, आस्ताद काळे, प्रवीण तरडे, राजन भिसे, राहुल मेहंदळे, अंशुमन विचारे आदी कलाकार आहेत. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार सहनिर्माते आहेत. छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. १ जून रोजी हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *