Breaking News

Tag Archives: governer c.vidhyasagar rao

८ कँबिनेट मंत्र्यांसह ५ राज्यमंत्र्यांनी घेतली पदाची शपथ बडोले,सवरा, महेता यांच्यासह तीन राज्यमंत्र्यांना नारळ

मुंबईः प्रतिनिधी गेली अनेक महिने होणार होणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चेला आज रविवारी पूर्ण विराम मिळाला. विखे-पाटील, क्षिरसागर, कुटे, खाडे यांच्यासह ८ कँबिनेट मंत्र्यांनी तर सागर, महातेकर, सावे यांच्यासह ५ राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल सी.विद्यासागर यांनी राजभवनात छोटेखानी झालेल्या समारंभात …

Read More »

उदय देशपांडे यांना जीवनगौरव तर साहसी क्रीडा पुरस्कार प्रियांका मोहिते यांना जाहीर

राज्यपालांच्या हस्ते होणार वितरण मुंबई : प्रतिनिधी  राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत. येत्या १७ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया येथे राज्यपाल सी. विदयासागर राव यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली. …

Read More »

मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी कॉलेजला प्रवेश मिळणार कायद्यातील सुधारणेस राज्यपालांची मंजूरी

मुंबई : प्रतिनिधी सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्र, ही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे. …

Read More »

शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही विश्व कल्याणासाठीची सर्वात मोठी गरज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचे प्रतिपादन

मुंबई : प्रतिनिधी व्यक्तिगत, सामाजिक ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सौहार्दाच्या वातावरणाची निर्मिती ही आजची सर्वात मोठी गरज आहे. त्यादृष्टीने एक आश्वासक पाऊल म्हणून आंतरराष्ट्रीय अहिंसा संशोधन व अध्यात्म तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेने (आय-एआरटीआयएसटी-आय- आर्टिस्ट) विज्ञानाला अध्यात्माची जोड देण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांबरोबर काम करावे, असे आवाहन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले. आंतरराष्ट्रीय …

Read More »

कृषी संशोधनात राज्यातील शेतकऱ्यांचे कार्य प्रशंसनीय ११ वा सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण सोहळा राज्यपालांच्या हस्ते संपन्न

मुंबई : प्रतिनिधी कृषी संशोधन आणि विस्ताराच्या क्षेत्रात आपली कृषी विद्यापीठे उत्कृष्ट काम करत आहेत. मात्र, शेतीबाबत कोणतेही औपचारीक शिक्षण न घेतलेले अनेक शेतकऱ्यांनी विद्यापीठांपेक्षाही अधिक चांगले संशोधन केले आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी काढले. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्यावतीने रवींद्र नाट्य मंदिर  येथे काल आयोजित ‘११ व्या सह्याद्री कृषी सन्मान पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात ते बोलत …

Read More »

विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै पासून नागपूरला राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्याकडून तीन महिन्यानंतर आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधीमंडळाचे अधिवेशन ४ जुलै २०१८ पासून नागपूर येथे सुरु होणार आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद १७४, खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारात  विधान भवन, नागपूर  येथे ही बैठक बोलविली आहे.  विधान सभेचे कामकाज बुधवार दि. ४ जुलै २०१८ रोजी सकाळी ११.०० …

Read More »

पद्मश्री लावणी सम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांचे निधन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना दु:ख

सातारा-मुंबई : प्रतिनिधी मराठी तमाशा क्षेत्राला नवीन आयाम देणार्‍या ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी पद्मश्री यमुनाबाई विक्रम जावळे उर्फ यमुनाबाई वाईकर यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी वाई येथे खाजगी रुग्णालयात आज दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरविल्यामुळे त्यांच्यावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …

Read More »

२०२५ मध्ये देशाचे सकल उत्पन्न ५ ट्रिलियन डॉलर होणार सेवाविषयक जागतिक प्रदर्शनाचे राष्ट्रपतीं रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई  : प्रतिनिधी सेवा क्षेत्र आणि तंत्रज्ञानाच्या समन्वयातून भारताचे सकल घरेलू उत्पन्न २०२५ मध्ये पाच ट्रिलियन डॉलर इतके होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्यामध्ये सेवा क्षेत्राचा वाटा तीन ट्रिलियन डॉलर इतका असेल. रोजगार, उत्पादकता आणि नाविन्यता या क्षेत्रात सेवांचे प्राबल्य आहे. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वेगामुळे सेवा क्षेत्राचे योगदान शेती, उत्पादन क्षेत्र आणि …

Read More »

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, बेराजगारांना नोकऱ्या आणि बेघरांना घरे देणार राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी निर्णयांचा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडून पुर्नउच्चार

मुंबई : प्रतिनिधी कर्जमाफीपासून वंचीत राहिलेल्या जवळपास ३ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, लातूर येथे होणाऱ्या रेल्वे डब्याच्या कारखान्यामुळे प्रत्यक्षात २५ हजार नोकऱ्यांची निर्मिती आणि पुढीलवर्षापर्यंत सर्व बेघरांना हक्काची घरे देण्यासाठी १२ लाख घरे बांधण्याचा मनोदय तसेच पुढील पाच वर्षात एक लाखापेक्षा अधिक रोजगार निर्मिती या शासनाच्या महत्वाकांक्षी निर्णयाचा पुनरूच्चार करीत …

Read More »

राज्यपालांनी आता प्र.कुलगुरू- परिक्षा नियंत्रक आणि कुलसचिवांची नियुक्ती करावी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू संजय देशमुख यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होण्यास वेळ लागला. तसेच त्याच्या फटका अनेक विद्यार्थ्यांना बसू लागल्याच्या विरोधात शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी देशमुख यांना कुलगुरू पदावरून हटवित नवे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांची नियुक्ती केल्याबद्दल राज्यपालांचे …

Read More »