Breaking News

८ कँबिनेट मंत्र्यांसह ५ राज्यमंत्र्यांनी घेतली पदाची शपथ बडोले,सवरा, महेता यांच्यासह तीन राज्यमंत्र्यांना नारळ

मुंबईः प्रतिनिधी
गेली अनेक महिने होणार होणार मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या चर्चेला आज रविवारी पूर्ण विराम मिळाला. विखे-पाटील, क्षिरसागर, कुटे, खाडे यांच्यासह ८ कँबिनेट मंत्र्यांनी तर सागर, महातेकर, सावे यांच्यासह ५ राज्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अन्य महत्वाच्या व्यक्तींच्या उपस्थितीत मंत्री पदाची शपथ घेतली.
राज्यपाल सी.विद्यासागर यांनी राजभवनात छोटेखानी झालेल्या समारंभात या १३ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
कँबिनेट मंत्री म्हणून राधाकृष्ण विखे-पाटील, आशिष शेलार, डॉ.संजय कुटे, आशिष शेलार, सुरेश खाडे, डॉ.अनिल बोंडे, अशोक उल्के यांचा भाजपच्या कोट्यातून कँबिनेट मंत्री म्हणून शपथविधी झाला. तर शिवसेनेच्या कोट्यातून जयदत्त क्षिरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्री पदाची शपथ घेतली.
याशिवाय राज्यमंत्री म्हणून योगेश सागर, अविनाश महातेकर, संजय उर्फ बाळा भेगडे, डॉ.परिणय फुके, अतुल सावे यांनी शपथ घेतली.
विद्यमान मंत्रिमंडळातील सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदीवासी मंत्री विष्णू सवरा आणि एम.पी.मिल कंपाऊड प्रकरणी दोषी ठरलेले प्रकाश महेता यांची उचलबांगडी करण्यात आली. तर राज्यमंत्री असलेले सामाजिक न्यायचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील आणि आदीवासी विकास राज्यमंत्री राजे अंम्बरीष आत्राम यांना नारळ दिला.

आणि मराठी ई बातम्याचे वृत्त खरे ठरले

आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासोबत आशिष शेलार, जयदत्त क्षिरसागर, संजय कुटे, डॉ. अनिल बोंडे, अतुल सावे, योगेश सागर यांचा समावेश होणार असल्याचे वृत्त दिले होते. तसेच प्रकाश महेता यांची उचलबांगडी होण्याची शक्यता असल्याचे भाकित व्यक्त केले होते. त्यानुसार सर्वांनी मंत्री पदाची शपथ घेतल्याने  मराठी ई बातम्याने दिलेले कालचे व वृत्त खरे ठरले.  

 

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *