Breaking News

मुंबईतल्या या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ मध्य रेल्वेने घेतला निर्णय

मागील एप्रिल महिन्यात मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरात अलार्म चेन पुलिंगच्या (आपत्कालीन साखळी) ३३२ घटना घडल्या आहेत. यामध्ये बऱ्याच जणांनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढल्याच्या घटना घडल्या असून अशा गैरकृत्यांमुळे एप्रिल महिन्यात अनेक एक्स्प्रेस रेल्वे उशिरा धावल्या. यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने ट्विटरद्वारे दिली.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटर खात्यावरून दिली आहे. संबंधित वाढ उद्यापासून म्हणजेच ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी राहणार आहे.

एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटना घडल्या आहेत. यातील ५३ घटना ह्या योग्य कारणासाठी घडल्या आहेत. तर २७९ प्रकरणांत आरोपींनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. संबंधित आरोपींविरोधात भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बरेच गुन्हे अज्ञात आरोपींविरोधात आहेत. पकडलेल्या आरोपींकडून आतापर्यंत ९४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटरवरून दिली.

रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं पुढील १५ दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे. त्यामुळे सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत येणाऱ्या मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्म तिकीटासाठी ५० रुपये द्यावे लागणार आहेत.

Check Also

मुंबई काँग्रेस म्हणते, सर्व आगामी निवडणुकांमध्ये EVM मशीन ऐवजी Ballot Paper चा वापर करा भाई जगताप यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी

वर्ष २०१६ ते २०१९ या कालावधीत, नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशभरातून सुमारे १९ लाख …

Leave a Reply

Your email address will not be published.