Breaking News

महापालिका रूग्णालयातील आरोग्य सेविकांचे मंत्रालयासमोर ठिय्या आंदोलन

४००० हजार सेविकांचे आंदोलन

 मुंबई : प्रतिनिधी

 मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या रूग्णालयातील आरोग्य सेविकांना किमान वेतन कायदा लागू करावा यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी गेले दोन  दिवस संपावर असलेल्या आरोग्य सेविकांनी आज बुधवारी थेट मंत्रालयावर धडक मोर्चा काढत मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सरकारच्या विरोधात घोषणा देत ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात तब्बल ४००० आरोग्य सेविका सहभागी झाल्या होत्या. परंतु त्यांची कैफीयत ऐकण्यासाठी एकही मंत्री मंत्रालयात उपलब्ध नव्हता.

 पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या आरोग्य सेविकांना ताब्यात घेऊन त्यांना मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी नेले. 

महिलांच्या ठिय्या आंदोलनाने पोलिसांची ही  ऐनवेळी तारांबळ उडाली. त्यानंतर आरोग्य सेविकांच्या प्रतिनिधीना पोलिसांनी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी मंत्रालयात आणण्यात आले. किमान वेतन कायदा, प्रसूती कायद्यानुसार रजा, भविष्य निर्वाह निधी, किमान घरभाडे भत्ता या मागण्यांसाठी गेले दोन दिवस मुंबई महापालिकेतल्या चार हजार आरोग्य सेविकांनी बेमुदत संप पुकारला.

गेली वीस वर्ष आरोग्य सेविकांच्या मागण्यांसाठी लढा सुरूच आहे. २ मार्च २००२ साली औद्योगिक न्यायाधिकरणाने आरोग्य सेविका या मुंबई महापालिका कर्मचारी असल्याचा निवडा केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतरही सरकार दरबारी न्याय मिळत नसल्याने आंदोलनाचे हत्यार उपसावे लागल्याचे आरोग्य सेविका मंजू कांबळे यांनी सांगितले. 

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *