Breaking News

दहावी आणि बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर बोर्डाच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे हे अंतिम वेळापत्रक असून, बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे.

राज्य मंडळाने काही दिवसांपूर्वी १० वी आणि १२ वीच्या परीक्षांबाबत संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले होते. या वेळापत्रकाबाबत सूचना किंवा हरकती नोंदविण्यासाठी मंडळाने पंधरा दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार, बोर्डाच्यावतीने आता अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. २०२४ मध्ये बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च या कालावधीत पार पडणार आहे.

त्याचप्रमाणे, बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. एसएससी बोर्ड परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना दिनांकनिहाय परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येणार आहे. दहावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा १० ते २९ फेब्रुवारी या कालावधीत होईल. तर, बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा २ ते २० फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

Check Also

सलमान खानच्या घरासमोरील गोळीबार घटनेची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली

पहाटेच्या वेळी सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलसी या घरासमोर दोन अज्ञात व्यक्तींनी बाईकवर येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *