Breaking News

एमपीएससी परिक्षार्थींसाठी खुषखबर ! परिक्षेची ऑनलाईन उत्तर पत्रिका मिळणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

सरकारी सेवेत येवू इच्छिणाऱ्या अनेक तरूण एमपीएससीची अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र आपण सोडविलेल्या उत्तर पत्रिकेतील उत्तरे कितपत बरोबर किंवा चुकीची आहेत त्या आधारे किती गुण दिले याची प्रत्यक्ष माहिती आता या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परिक्षेतील पारदर्शकता आणण्याचा भाग म्हणून  एमपीएससी २०२० च्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या परिक्षार्थीना त्यांच्या उत्तर पत्रिका आता ऑनलाईन पाहता येणार आहेत.

एमपीएससीने यासंदर्भात एक पत्रक जाहीर केले असून त्याद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांची उत्तर पत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावर तशी सोय करून देण्यात आली आहे.

एमपीएससीने घेतलेल्या या निर्णयामुळे उत्तर पत्रिका तपासण्यामधील आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तराची खातरजमा आता विद्यार्थ्यांनाच करता येणार असून त्यामुळे त्यांना स्वत:चे मुल्यमापन करण्यास मदत होणार आहे.

Check Also

यंदाच्या वर्षात फक्त २५ दिवस सुट्ट्या, ८ दिवसांचा सरकारी कर्मचाऱ्यांचा तोटा राज्य सरकारकडून सुट्यांचे वेळापत्रक जाहीर-शनिवार-रविवारमुळे ८ दिवस अतिरिक्त काम करावे लागणार

मराठी ई-बातम्या टीम यंदाच्या वर्षभरात राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षक-शाळा-महाविद्यालये, यासह निमसरकारी संस्थांना २०२२ या आगामी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *