मुंबई : प्रतिनिधी
सरकारी सेवेत येवू इच्छिणाऱ्या अनेक तरूण एमपीएससीची अर्थात महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परिक्षा देत असतात. मात्र आपण सोडविलेल्या उत्तर पत्रिकेतील उत्तरे कितपत बरोबर किंवा चुकीची आहेत त्या आधारे किती गुण दिले याची प्रत्यक्ष माहिती आता या परिक्षार्थी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. परिक्षेतील पारदर्शकता आणण्याचा भाग म्हणून एमपीएससी २०२० च्या स्थापत्य अभियांत्रिकीच्या परिक्षार्थीना त्यांच्या उत्तर पत्रिका आता ऑनलाईन पाहता येणार आहेत.
एमपीएससीने यासंदर्भात एक पत्रक जाहीर केले असून त्याद्वारे स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना त्यांची उत्तर पत्रिका ऑनलाईन पाहता येणार आहे. त्यासाठी एमपीएससीच्या संकेतस्थळावर तशी सोय करून देण्यात आली आहे.
एमपीएससीने घेतलेल्या या निर्णयामुळे उत्तर पत्रिका तपासण्यामधील आणि विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या उत्तराची खातरजमा आता विद्यार्थ्यांनाच करता येणार असून त्यामुळे त्यांना स्वत:चे मुल्यमापन करण्यास मदत होणार आहे.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षेच्या निर्णयात पारदर्शकता ठेवण्याच्या उद्देशाने उमेदवारांच्या मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन प्रत, दिलेले गुण आदी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. pic.twitter.com/Y4hZCyi9f6
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 22, 2021