Breaking News

विधानसभा निवडणूकीपूर्वी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न एमआयएमचे नवनिर्वाचित खा. इम्तियाज जलील यांचा आरोप

औरंगाबादः प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणूकीनंतर काही पक्षाचे पदाधिकारी जनतेमध्ये दहशत पसरवत आहेत. कारण प्रचाराकरिता त्यांच्याकडे मुद्देच नसल्याचा आरोप एमआयएमचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत केला.
खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलतांना जलील म्हणाले की, औरंगाबादेत विमान, रेल्वे सेवा वाढवण्यावर भर दिला जाईल, कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीत वंचित आघाडीकडून राज्यात मोठा बदल घडवण्यात येईल. तसेच शहराच्या विकासासाठी माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्याकडून शहर विकासासंदर्भात आपण मार्गदर्शन घेणार असल्याचे स्पष्ट करत शहरात शांतता राखून विकास करणे हेच आमचे ध्येय आहे.
बहुचर्चित समांतर प्रकल्प हा रद्द करुन शहराचा सुरळित पाणी पुरवठा करण्याचा प्रयत्न केंद्र व राज्य शासनाच्यावतीने नियमित सुरु आहे. शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व समाज घटकांच्या पाठिंब्यावर आपण निवडून आल्याचेही त्यांनी आर्वजून नमूद केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *