Breaking News

महाराष्ट्र बंदला हिंसेचे गालबोट बंद शांततेत पार पाडण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

कोरेगाव भिमा येथील दलितांवरील हल्ल्याच्या निशेधार्थ राज्यातील विविध दलित संघटना आणि राजकिय पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्यास राज्यातील सर्वधर्मिय नागरीकांनीही मुकपणे पाठिंबा देत हा महाराष्ट्र बंद करण्यास हातभार लावत असताना या बंदला गालबोट लागावे यासाठी काही समाजकंटकांनी मुंबईत बसेस, रेल्वे स्थानकातील तिकीट खिडक्यांवर आणि राज्यातील काही भागात एसटी बसेसवर दगडफेक करत हिंसा घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

दलित संघटनांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला जवळपास सर्वचस्तरातून मूक पाठिंबा मिळत असल्याचे दिसत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, यवतमाळ, सोलापूर, नागपूर शहरांमध्ये कडकडीत आणि शांततेत बंद पाळण्यात येत आहे. तर पुणे आणि अन्य काही शहरांमध्ये तणाव निर्माण करण्याच्या उद्देशाने दगडफेकीच्या हिंसक घटना घडत बसेसना आग लावण्याचेही काम या समाजकंटकांकडून करण्यात येत आहे. या हिंसक कारवाया करणाऱ्यांना पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी दलित कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान बंदसाठी आंदोलन, निदर्शने करताना पोलिसांनी अटक केल्यास भीम आर्मी या सामाजिक संघटनेकडून कायदेशीर मदत देण्यात येत असून दलित कार्यकर्त्यांना जामीन मिळवून देण्यासाठी मुंबईतील दादरसाठी जिंतेंद्र कांबळे (मो.९५९४२३७६६४, ९८९२६०५२१०), कुर्लासाठी धर्मा कांबळे (मो.९८२१५७२८१६,९२२१८२२१५१), विक्रोळीसाठी विकास कांबळे (मो.९५९४००१७५८), बांद्रासाठी संदीप रणखांबे (मो.९९६७७३५३१३, ८१०८२६२१६९), ठाणेसाठी हर्षराज जगताप (मो.९८६९१९९७४७,९८१९१२७३४७), कल्याणसाठी बिसू कर्मा (मो.८६५५५८०१८९), अंधेरीसाठी अमोल लांडगे (मो.९२२१००४०९२) राजू ओव्हाळ (मो.८०९७८५८३२) आणि औरंगाबादसाठी डॉ कुणाल खरात (मो.९५८९२९७७७७), राजू अमराव (मो.९८९०७८६७७७२) या वकीलांची नियुक्ती केली आहे.

दरम्यान, बंदला हिंदस वळण लागून गालबोट लागू नये यासाठी दलित कार्यकर्त्यांनी शांततेत बंद पार पाडावा असे आवाहन करत पोलिस ज्या तत्परतेने भीमसैनिकांवर कारवाई करत आहे. त्या तत्परतेने कोरेगाव भिमा येथील समाजकंटकावर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित करत त्या समाजकंटकावर आणि षढयंत्र रचणाऱ्यांवर ३०२ खाली गुन्हे नोंदवावीत अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनीही महाराष्ट्रातील शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारांशी एकरुप झालेल्या जनतेने या परिस्थितीला संयमाने सामोरे जावे असे आवाहन करत

भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनेची संतप्त पडसाद सबंध महाराष्ट्रभर उमटत आहेत. आमची विनंती आहे की, शांततेच्या मार्गाने आपली भूमिका, संवेदना मांडल्या जाव्यात. काही जातीयवादी शक्ती जाणीवपूर्वक समाजा-समाजात, धर्मा-धर्मामध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *