Breaking News

कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील का ओसरत नाही? भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार

मुंबई : प्रतिनिधी

मुंबईतील पाऊस ओसरला तरी पाण्याचा निचरा होत नव्हता याबाबत चिंता व्यक्त करीत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी कलानगरचे पाणी ओसरले मुंबईतील अन्य ठिकाणचे का पाणी ओसरत नाही? असा सवाल उपस्थित केला.

याबाबत बोलताना आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, पाऊस जास्त पडला सांगत पावसावर खापर फोडू नका.नुसते फिरुन उपयोग काय? ब्रिटानियाचे पंपिंग स्टेशन पुर्ण क्षमतेने का चालत नाही ते सांगा? मायक्रो टनेलची कामे वेळेत पुर्ण का झाली नाही ते ही सांगा? पाण्याचा निचरा होण्यास ऐवढा विलंब कधी होत नव्हता, मग आता का विलंब होतोय हेही सांगा? हिंदमाता, वरळीसह अनेक भागातील पाण्याचा निचरा का होत नाही? मुंबईकरांच्या घरातील पाणी का अजून कमी होत नाही? ११६% नालेसफाईचे दावे कुठे गेले? रात्री अजून पाऊस झाला तर मुंबईकरांनी करायचे काय? कलानगरचे पाणी तातडीने ओसरते मग मुंबईतील अन्य ठिकाणांचे का नाही?

विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणासह अनेक भागात पावसाने उभ्या पिकांचे अतोनात नुकसान केले. या हाहाकाराकडे, उध्वस्त शेतकऱ्यांकडे ठाकरे सरकारने ना पाहिले, ना मदत केली. त्यामुळे मुंबईकर हो! सरकारच्या दुष्टीने मुंबईतील पूर म्हणजे नेहमीचाच पावसाळा शांतता राखा, सरकारचे बदल्या, टेंडर वाटप सुरु आहे, असा टोलाही लगावला आहे.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *