Breaking News

आमच्याबद्दल प्रेम असल्याने इन्कम टॅक्स विभाकडून नोटीस त्या दोघांना नाही मात्र स्वत:ला नोटीस मिळाल्याची शरद पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

निवडणूकीत सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रातील उत्पन्नाच्या माहितीवरून खासदार सुप्रिया सुळे आणि राज्य मंत्रिमंडळातील पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या त्या प्रतिज्ञापत्रातील माहितीचे निवडणूक आयोगाने तपासणीचे आदेश दिले आहेत. मात्र सुप्रिया सुळेंना याबाबतची तशी नोटीस अद्याप आलेली नाही पण आयकर अर्थात इन्कम टॅक्स विभागाकडून निवडणऊक आयोगाच्यावतीने पाठविलेली नोटीस आपल्याला मिळाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देत आमच्याबद्दल प्रेम असल्यानेच अशा काही नोटीसा आम्हाला पाठविण्यात येत असल्याची मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.

राज्यसभेत झालेल्या प्रकारामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

२००७ ते २०१९ पर्यत निवडणूक काळात सादर केलेल्या उत्पन्नाच्या स्त्रोताच्या अनुषँगाने ही नोटीस बजाविण्यात आली आहे. मिळालेल्या नोटीसीत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार असा उल्लेख इन्कम टॅक्स विभागाने पाठविलेल्या नोटीसीत आहे. त्यामुळे त्या नोटीसीला लवकरात लवकर उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

देशातील इतक्या सदस्यांमध्ये आमच्याबद्दल प्रेम आहे. त्याबद्दल आनंद झाला. या नोटिसीचं उत्तर द्यावं लागेल. नाहीतर दंड असतो. त्यामुळे त्या नोटिसीचं उत्तर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

केंद्राकडे बोट दाखविणारे आघाडी सरकार या नाकर्तेपणाचे उत्तर देणार का ? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा सवाल

जालना: प्रतिनिधी केंद्र सरकारने गेल्या वर्षी लॉकडाऊन च्या कालावधीमध्ये गोरगरीबांना देण्यासाठी पाठवलेली ६ हजार ४४१ मेट्रिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *