Breaking News

गृहमंत्री देशमुख म्हणाले, परमबीर सिंगाचा आरोप स्वत:चा बचावासाठी आरोप खोटे असल्याचा दावा

मुंबई: प्रतिनिधी

महिन्याला १०० कोटी रूपये वसुली करून द्यावे आणि खासदार मोहन डेलकर मृत्यूप्रकरणाचा तपासावरून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. परंतु परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे स्वत:च्या बचावासाठी करण्यात आलेले असून ते आरोप खोटे असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

विशेष म्हणजे परमबीर सिंग यांचे पत्र व्हायरल होवून काही तासातच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खुलाशामुळे परमबीर सिंग यांच्या आरोपात आणि अनिल देशमुख यांच्यात नक्कीच पाणी मुरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

मात्र राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याने थेट आपल्याच खात्याच्या मंत्र्यावर अशा पध्दतीने आरोप करण्याची वेळ आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणामुळे आता गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांची गच्छंती अटळ असल्याचे बोलले जात आहे.

Check Also

शरद पवार यांचा हल्लाबोल, नरेंद्र मोदींचे भाषण म्हणजे लबाडाघरचं आवताण…

सामान्य माणसाची महागाईतून सुटका केली नाही. १० वर्षांत स्वतः काही केले नाही, आणि हिशेब आम्हाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *