Breaking News

आरोग्य

जगप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.गोयल यांचे निधन वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

मुंबई :प्रतिनिधी  जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी.के गोयल यांचे आज सकाळी हृदयविकरणे निधन झाले.  वयाच्या ८२ व्या वर्षी डॉ. गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना घरी असतानाच हृदय विकाराचा झटका आला. ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. सेलिब्रिटिपासून ते गोरगरीब रुग्णापर्यंत सर्वांनाच आधार वाटणारे डॉ. गोयल यांच्या …

Read More »

औरंगाबादची राज्य कर्करोग संस्था उपचार व संशोधनासाठी मैलाचा दगड ठरेल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नाड्डा यांचा विश्वास

औरंगाबाद: प्रतिनिधी भाभाट्रॉन-२ युनिटमुळे कर्करोगाच्या रुग्णांना अद्ययावत व जलदगतीने उपचार मिळण्यास मदत होणार असल्याने औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय हे कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जे.पी. नाड्डा यांनी आज व्यक्त केला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय …

Read More »

राज्यातील २ कोटी ८० लाख मुलांना जंतनाशक गोळी देणार राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सरकारकडून मोहीम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून उद्यापासून १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतांनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या उपक्रमात राज्यातील वय वर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे …

Read More »

क्लिनिकल अॅक्टसाठी पुन्हा त्याच तज्ञांचे मत जाणून घेण्यात काय हाशील? डॉ. अभिजित मोरे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईः अनिल गलगली खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ म्हणजेच महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना विधेयक २०१४ राज्यात अंमलात आणण्यापूवी ‘संबंधित क्षेत्रातील व्यक्ती वा संस्था यांचे स्पष्ट अभिप्राय जाणून घेण्यासाठी’ राज्य सरकारने डॉ मोहन जाधव, उपसंचालक (रुग्णालये) यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना केली. मात्र या समितीत पुन्हा त्याच कार्पोरेट कंपन्याचा समावेश …

Read More »

मोदी सरकारचा आणखी एक जुमला म्हणजे आयुष्यमान भारत कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने जाहीर केलेली ‘आयुष्यमान भारत’ योजना म्हणजे मोदी सरकारचा अजून एक नवा ‘जुमला’ असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गेल्या चार वर्षातील सरकारने जाहीर केलेल्या प्रत्येक योजनेचे जनतेला सांगितलेले आकडे व प्रत्यक्षात झालेला खर्च पाहता मोदी सरकार गेल्या चार वर्षापासून सरकार चालवतेय …

Read More »

ग्रामीण भागातील मुली-महिलांना ५ ते ३० रूपयात सॅनेटरी नॅपकिन मिळणार अस्मिता योजनेंतर्गत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुंबईः प्रतिनिधी राज्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या मुली आणि महिलांच्या आरोग्याच्यादृष्टीने महत्वाचे असलेले सॅनिटरी नॅपकिन माफक दरात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे या नॅपकिन अस्मिता योजनेंतर्गत ५ रूपयांपासून ते ३० रूपयांपर्यत महिला व मुलींना देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अस्मिता योजनेअंतर्गत स्वयंसहाय्यता समूहाव्दारे ग्रामीण …

Read More »

राज्याला पोलिओमुक्त करण्यासाठी ८५ हजार बुथची उभारणी २८ जानेवारीला विशेष मोहिम राबविणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातून पोलिओ आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ८५ हजार बुथची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी २८ जानेवारी  व ११ मार्च रोजी पोलिओ लसीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी दिली. या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील एक कोटी २१ लाख २९ हजार बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट आहे. …

Read More »

कर्करोगावर सातत्याने नवे संशोधन होत राहणे गरजेचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची सूचना

मुंबई : प्रतिनिधी वैद्यकशास्त्रात पदवी घेतलेल्या संशोधकांनी कर्करोग क्षेत्रात सातत्याने संशोधन करीत राहणे आवश्यक आहे. मात्र या अनुषंगाने प्राचीन आयुर्वेदामधून काही पर्यायी उपाय मिळू शकतात का यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त करत कर्करोगावर स्वदेशी आणि परवडणारे उपायांच्या अनुषंगाने संशोधन करावे अशी सूचनाही त्यांनी …

Read More »

मायमेडिसीन बॉक्सची राष्ट्रव्यापी व्हिटामिन-डी विरोधी जागरुकता मोहिम २९ राज्यांतील २ हजार ठिकाणी, १ दशलक्ष लोकांना सेवा प्रदान करणार

मुंबई: प्रतिनिधी मायमेडिसीनबॉक्स कंपनीच्यावतीने देशातील व्हिटामिन–डीच्या कमतरतेबाबत जनजागृती अभियान राबविणार असून देशात एकाचवेळी २ हजार ठिकाणी सेवा पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी घरी औषधांचे वितरण आणि प्रयोगशाळा चाचण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. देशात ६५–७०% लोकसंख्येत व्हिटामिन–डीची कमतरता असल्याने त्याबाबत जनजागृकता अभियान राबविण्यात येणार आहे. आजच्या जगात जेथे जीवन अतिशय वेगवान …

Read More »

भटक्या कुत्र्यांसाठी रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविणार मुख्यमंत्र्याशी चर्चा करून धोरण तयार करणार असल्याची आरोग्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. या कुत्र्यांच्या चाव्याने झालेल्या रेबीजच्या रूग्णामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्याही जास्त असल्याने भटक्या कुत्र्यांना रेबीज प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक असून यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन धोरण तयार करण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज …

Read More »