Breaking News

जगप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.गोयल यांचे निधन वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

मुंबई :प्रतिनिधी 

जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी.के गोयल यांचे आज सकाळी हृदयविकरणे निधन झाले.  वयाच्या ८२ व्या वर्षी डॉ. गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना घरी असतानाच हृदय विकाराचा झटका आला. ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. सेलिब्रिटिपासून ते गोरगरीब रुग्णापर्यंत सर्वांनाच आधार वाटणारे डॉ. गोयल यांच्या मृत्यूने वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

डॉ. गोयल यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित कऱण्यात आले होते. डॉ. गोयल हे बॉम्बे हॉस्पिटल इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यासोबतचं जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉडीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून कार्यरत होते.

Check Also

Corona JN-1 टास्क फोर्सच्या बैठकीत घेतले “हे” निर्णय

राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-1’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळत असल्याने ‘कोरोना टास्क फोर्स’’ स्थापन करण्यात आले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *