Breaking News

आरोग्य

मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेतील नव्या वीस मोटार बाईकचे लोकार्पण मुंबईसह राज्यातील इतर भागातही बाईक अँम्ब्युलन्स सुरू होणार

मुंबई : प्रतिनिधी आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या मोटार बाईक अँम्ब्युलन्स सेवेचा विस्तार करण्यात आला आहे. या सेवेत आज आणखी २० मोटार बाईकचा समावेश करण्यात आला असून, त्याचा लोकार्पण सोहळा परिवहन मंत्री दिवाकर रावते, शिक्षण मंत्री विनोद तावडे व सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या उपस्थितीत मंत्रालयात …

Read More »

आर्थिक दुर्बल घटकातील रूग्णांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळणार राज्य सरकारची नवी योजना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांतील अर्थात ८५ हजार ते एक लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न असणाऱ्या नागरीकांना मोफत व सवलतीच्या दरात उपचार मिळावेत यासाठी नवी योजना राज्य सरकारकडून आणण्यात आली आहे. ही योजना धर्मादाय रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या दुर्बल घटकातील नागरीकांसाठी लागू होणार असल्याची माहिती विधि व न्याय विभागातील अधिकाऱ्यांनी …

Read More »

१५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करणार साथीच्या रोगावर विभागाने विशेष लक्ष देण्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने आतापासून तयारी सुरू करावी. तसेच विभागाने निम्नशहरी भागात विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी यावेळी दिले. १५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. स्वाईन फ्ल्यू प्रयोग शाळा नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या …

Read More »

सरकारी आरोग्य केंद्रांत वैद्यकीय उपकरणे पुरविण्याची फिलिप्स कंपनीची तयारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि फिलिप्सचे मेझॉन यांच्यात चर्चा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सरकारी आरोग्य केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय उपकरण सुविधा पुरविण्याबाबत फिलिप्स कंपनीने तयारी दर्शविली असून प्रस्तावावर अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाला दिल्या. फिलिप्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी आज वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आरोग्य विषयक प्रस्तावावर विस्तृत चर्चा केली. …

Read More »

राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ फक्त अर्धा टक्के लोकांना प्रभावी अंमलबजावणी न झाल्याचा कॅगचा ठपका

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्वसामान्य गरीब आणि शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा प्रत्यक्ष लाभ आता पर्यंत फक्त अर्धा टक्के नागरीकांना मिळाला आहे. तसेच या योजनेचा फायदा सर्वसामान्य नागरीकांऐवजी खाजगी कंपनी आणि विमा कंपन्यांना झाल्याचा ठपका ठेवत या योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी आणि …

Read More »

केवळ पुरवठा रखडू नये म्हणून खाजगी कंत्राटदाराकडून औषधांची खरेदी आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांचा माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकीय रूग्णालये आणि आरोग्य केंद्रासह इतर विभागांना औषधांचा तुटवडा भासू नये यासाठी आरोग्य विभागाकडून अजूनही खाजगी औषध विक्रीकरणाऱ्या कंत्राटदारांकडूनच खरेदी करण्यात येत आहे. मात्र हाफकीन मार्फत औषधांची खरेदी हळूहळू सुरु करण्यात येत असल्याने त्यास वेळ लागणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी विधानसभेत दिली. …

Read More »

जगप्रसिध्द हृदयरोग तज्ञ डॉ.गोयल यांचे निधन वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा

मुंबई :प्रतिनिधी  जगप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. बी.के गोयल यांचे आज सकाळी हृदयविकरणे निधन झाले.  वयाच्या ८२ व्या वर्षी डॉ. गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास त्यांना घरी असतानाच हृदय विकाराचा झटका आला. ब्रीच कॅंडी रुग्णालयात नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मावळली. सेलिब्रिटिपासून ते गोरगरीब रुग्णापर्यंत सर्वांनाच आधार वाटणारे डॉ. गोयल यांच्या …

Read More »

औरंगाबादची राज्य कर्करोग संस्था उपचार व संशोधनासाठी मैलाचा दगड ठरेल केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नाड्डा यांचा विश्वास

औरंगाबाद: प्रतिनिधी भाभाट्रॉन-२ युनिटमुळे कर्करोगाच्या रुग्णांना अद्ययावत व जलदगतीने उपचार मिळण्यास मदत होणार असल्याने औरंगाबाद येथील शासकीय कर्करोग रुग्णालय हे कर्करोग उपचार व संशोधन क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरेल असा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जे.पी. नाड्डा यांनी आज व्यक्त केला. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय …

Read More »

राज्यातील २ कोटी ८० लाख मुलांना जंतनाशक गोळी देणार राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त सरकारकडून मोहीम आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कृमीदोष हा लहान वयात सहज होणारा व गंभीर आजार आहे. याचा थेट दुष्परिणाम बालकांच्या शारीरिक व वैयक्तिक विकासावर होतो. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोग्य विभागाकडून उद्यापासून १० ते १५ फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय जंतांनाशक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या उपक्रमात राज्यातील वय वर्ष १ ते १९ वयोगटातील सुमारे …

Read More »

क्लिनिकल अॅक्टसाठी पुन्हा त्याच तज्ञांचे मत जाणून घेण्यात काय हाशील? डॉ. अभिजित मोरे यांचा राज्य सरकारला सवाल

मुंबईः अनिल गलगली खाजगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या ‘महाराष्ट्र क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट’ म्हणजेच महाराष्ट्र वैद्यकीय आस्थापना विधेयक २०१४ राज्यात अंमलात आणण्यापूवी ‘संबंधित क्षेत्रातील व्यक्ती वा संस्था यांचे स्पष्ट अभिप्राय जाणून घेण्यासाठी’ राज्य सरकारने डॉ मोहन जाधव, उपसंचालक (रुग्णालये) यांच्या नेतृत्वाखाली समितीची स्थापना केली. मात्र या समितीत पुन्हा त्याच कार्पोरेट कंपन्याचा समावेश …

Read More »