Breaking News

आरोग्य

ऊसतोडणी कामगारांचे हाल थांबवा हो… ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेची मागणी

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने ऊस तोडणी कामगारसाठी सोयीसुविधा पुरविण्याबाबतचा जीआर सरकारने काढला. मात्र यातील तरतूदीनुसार साखर कारखानदारांनी ऊसतोडणी कामगारपर्यत कोणत्याही गोष्टी पोहोचल्या नाहीत. भोजन निवास ना वैदयकिय तपासणी सुरक्षा या कोणत्याच गोष्टी कारखानदारने अद्याप दिलेल्या नाहीत. त्यामुळे स्वत:चे होणारे हाल थाबविण्यासाठी वैतागलेला आणि भयभीत झालेला ऊसतोडणी कामगार हा आपल्या …

Read More »

कोरोनावरील उपचारासाठी कोकणसह मराठवाडा, विदर्भात विशेष रुग्णालये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई :प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील कोकणसह मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील ३० शासकीय रुग्णालयांचे रूपांतर कोरोनासाठीच्या विशेष रुग्णालयात करत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जाणार असून त्यासाठी २३०५ खाटा उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच …

Read More »

घरबसल्या करोना चाचणी करायची मग वापरा हे ऑनलाईन टूल राज्य सरकारकडून स्वचाचणी टूलची निर्मिती

मुंबई : प्रतिनिधी करोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सेल्फ असेसमेंट (स्व-चाचणी) टूल बनवले आहे. प्राथमिक पातळीवर करोनाची लक्षणे ओळखण्यासाठी या टूलचा उपयोग होतो. हे टूल सर्वांसाठी https://covid-19.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून वैद्यकीय सल्ला हवा असेल तर आवश्यक ती माहिती आणि संपर्क क्रमांकही या लिंकवर उपलब्ध आहे. हे स्व-चाचणी टूल …

Read More »

…. आता खैर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

 मुंबई : प्रतिनिधी   इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजीखरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.  …

Read More »

शासन, महापालिकांच्या रूग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी वाहनाची सोय करा सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव सुदर्शन शिंदे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बऱ्याच भागात बंद झाल्याने राज्य सरकार आणि महापालिकांच्या  अखत्यारीत असलेल्या रूग्णालयात कोरोनाला रोखण्यासाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रूग्णालयात पोहोचणे जिकरीचे होत आहे. यापार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांना वेळेवर आणण्यासाठी …

Read More »

ट्रेसिंग, टेस्टींग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनुसार कोरोनाचा प्रतिबंध कोरोनाबाधीत १९ रुग्णांना घरी सोडल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट असताना राज्यातील खासगी डॉक्टरांनी भीती पोटी दवाखाने बंद ठेवू नयेत असे आवाहन करत परिस्थितीत संवेदनशीलता दाखवून डॉक्टरांनी रुग्णालये सुरू करून नागरीकांना सेवा द्यावी. तसेच संचारबंदी काळात राज्यात रक्तदान शिबीरे घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संस्थांना सहकार्य करावे. त्याचबरोबर कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन सध्या ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट …

Read More »

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ मात्र १५ जण बरे होण्याच्या मार्गावर ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्पाचे आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी १५ रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून ही समाधानाची बाब असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करत जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला …

Read More »

घरबसल्या आरोग्य तंदरूस्तीचे आयुर्वेदीक १३ कलमी उपाय आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शेखर मगर यांच्या सूचना

१.अंघोळीला शक्यतो कोमट  किंवा गरम पाणी वापरावे  त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला अथवा कडुलिंबाचा पाला न मिळाल्यास  तुरटी टाकावी. २.दर तासाला तुरटीच्या  पाण्याने हात धुवावेत. ३.  सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठमधाच्या काढ्याने गुळणा कराव्यात , ज्येष्ठमध उपलब्ध न झाल्यास गरम मिठाच्या पाण्याने गुळणा कराव्यात .म्हणजे घशातील  टॉन्सिल्स मधील  जंतु हे  फुफ्फुसांमध्ये उतरणार …

Read More »

सुशिक्षित पण अडाणी वागणाऱ्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू लोकहितासाठी कठोर निर्णय घेत असल्याचे उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबईःखास बातमीदार कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर …

Read More »

आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री …

Read More »