Breaking News

आरोग्य

कोरोनाच्या डॉक्टर्स व आरोग्यसेवकांच्या काळजीपोटी राष्ट्रवादीचा पुढाकार संपूर्ण चेहरा झाकणाऱ्या मास्कचे वाटप करणार असल्याची शरद पवारांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना रुग्णसेवेतील डॉक्टर्स व आरोग्यसेवकांसाठी संपूर्ण चेहरा झाकणारी सव्वा लाख सुरक्षा आवरणे तयार करून वितरित करण्याचे काम राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल व इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने हाती घेण्यात आले आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. कोरोना व्हायरसच्या संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा …

Read More »

महाराष्ट्र कोरोनाबरोबरची लढाई जिंकतोय चिमुकल्यापासून ते आजीबाईंसह २९५ रूग्णांनी केली मात

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच याच कोरोनाग्रस्तांकडून या विषाणूवर मात करण्यात येत असून महाराष्ट्राचा कणखरपणा दाखवित २९५ जणांनी आजारातून बरे होवून दाखविले आहे. मुंबई महानगरातील २०६ जणांसह ८९ नागरिकांनी कोरोनावर मात केल्याचे दिसून आले आहे. राज्यात कोरोना चाचणीसाठी ५२ हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले …

Read More »

सोलापूरात आणखी १० कोरोनाबाधीत रूग्ण जिल्हाधिकारी शंभरकर यांची माहिती

सोलापूर: प्रतिनिधी राज्यात कोरोना विषाणू ग्रस्त रूग्णांची संख्या वाढत असताना सोलापूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रूग्ण नव्हता. मात्र मागील काही दिवसात एक रूग्ण सापडला त्यानंतर त्याचा मृत्यूही झाला. त्यानंतर काहीजणांच्या करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये निगेटीव्ह अहवाल प्राप्त झाला. मात्र आज १० कोरोनाबाधीत रूग्ण सापडल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. यापूर्वीचा रूग्ण …

Read More »

कोरोनाने एमएमआरमध्ये दोन हजार तर राज्यात २६०० ची संख्या ओलांडली सलग दुसऱ्यादिवशी मुंबईसह राज्यात ३५० जणांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्येत सातत्याने वाढ होत असून काल ३५० रूग्णांचे निदान झाले. तितकेच रूग्ण आजही पुन्हा सापडले आहेत. एकट्या मुंबई शहरात १७५६ वर रूग्ण संख्या पोहोचली आहे. तर ठाणे जिल्ह्यात २४४ संख्या असे मिळून मुंबई महानगर प्रदेशाने २ हजाराचा आखडा पार केला असून राज्याची संख्या २ हजार …

Read More »

राज्यातील संख्या २३३४ वर तर नव्या ३५२ रूग्णांचे निदान मृतकांच्या संख्येत ११ ने वाढ

आज राज्यात ३५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या २३३४  झाली आहे. तर राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ९ आणि पिंपरी चिंचवड तसेच मीरा भाईंदर येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. मृत्यूंबद्दल अधिकची माहिती – आज झालेल्या मृत्यूंपैकी  ४ …

Read More »

कोरोना लॉकडाऊन आणि मानसिक स्वास्थ्य निरोगी मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ञ डॉ हर्षल थडसरे यांचे खास सल्ले

आता ही गोष्ट सर्वाना माहित आहे कि, जगभर कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. आपल्या भारतात आणि त्यात ही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण, त्यामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. परंतु ह्या अतिसूक्ष्म विषाणूने एक अदृश्य भीती देखील निर्माण केली आहे. भीती आणि बेचैनी वेगवेगळ्या प्रकारची जसे कि,  हा आजार मला किंवा माझ्या …

Read More »

मुंबई महानगर प्रदेशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १५२० वर पोहोचली नवे रूग्ण २२१ , तर राज्यातील संख्या २ हजाराच्या जवळ

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील  कोरोनाग्रस्तांची संख्येवर नियंत्रण मिळविणे अवघड दिसत असतानाच मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईसह ११ महानगरपालिका हद्दीतील कोरोनाग्रस्तांची संख्या थेट १ हजार ५२० वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबई शहरासह महानगर प्रदेशातील संख्या वेगाने वाढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्या खालोखाल पुणे महानगर प्रदेशाचा नंबर असला तरी त्याची संख्या हजाराच्या …

Read More »

३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन : जनतेने खबरदारी घ्यावी आम्ही जबाबदारी घेवू १५ दिवसांनी वाढणार असल्याची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने जाहीर केलेला लॉकडाऊन १४ एप्रिल २०२० रोजी संपणार असला तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यातील लॉकडाऊन सुरु ठेवण्याची भूमिका राज्याच्यावतीने मांडण्यात आली. त्यामुळे या आजाराची साखळी तोडणे गरजेचे असून ही साखळी तोडण्यासाठी राज्यातील जनतेने खबरदारी आम्ही जबाबदारी घेत असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर …

Read More »

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावतीत चाचणीच्या सुविधा द्या आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस्ही उपलब्ध करून देण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली. कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयानों या गोष्टी करा अधिकारी कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क देण्याची सूचना

 मुंबई : प्रतिनिधी खाजगी रूग्णालयातील वैद्यकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवश्यक असलेले पीपीई किट, एन 95 मास्क, ग्लोव्हज व इतर साहित्य उपलब्ध करण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली असून त्यासंदर्भातील मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आले. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कक्षसेवक हे काम करत आहेत. या कर्मचाऱ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी खासगी रुग्णालय प्रशासनाने काळजी …

Read More »