Breaking News

आरोग्य

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १०७ मात्र १५ जण बरे होण्याच्या मार्गावर ‘मी घरी थांबणार, कोरोनाला हरवणार’ गुढीपाडव्यानिमित्त संकल्पाचे आरोग्यमंत्री टोपे यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या १०७ वर पोहोचली आहे. मात्र यापैकी १५ रूग्ण बरे होण्याच्या मार्गावर असून ही समाधानाची बाब असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देत या आजाराच्या प्रतिबंधासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. राज्यातील सर्वधर्मगुरूंनी ‘आरोग्यदूत’ बनून जनजागृती करावी, असे आवाहन करत जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नविन वर्षाच्या शुभेच्छा देताना ‘मी घरी थांबणार, कोरोनाला …

Read More »

घरबसल्या आरोग्य तंदरूस्तीचे आयुर्वेदीक १३ कलमी उपाय आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शेखर मगर यांच्या सूचना

१.अंघोळीला शक्यतो कोमट  किंवा गरम पाणी वापरावे  त्या पाण्यामध्ये कडुलिंबाचा पाला अथवा कडुलिंबाचा पाला न मिळाल्यास  तुरटी टाकावी. २.दर तासाला तुरटीच्या  पाण्याने हात धुवावेत. ३.  सकाळी व संध्याकाळी ज्येष्ठमधाच्या काढ्याने गुळणा कराव्यात , ज्येष्ठमध उपलब्ध न झाल्यास गरम मिठाच्या पाण्याने गुळणा कराव्यात .म्हणजे घशातील  टॉन्सिल्स मधील  जंतु हे  फुफ्फुसांमध्ये उतरणार …

Read More »

सुशिक्षित पण अडाणी वागणाऱ्या नागरिकांसाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू लोकहितासाठी कठोर निर्णय घेत असल्याचे उध्दव ठाकरे यांची घोषणा

मुंबईःखास बातमीदार कोरोनाला रोखण्यासाठी वेळोवेळी नागरिकांना आवाहन करूनही सुशिक्षित असूनही अडाणी व्यक्तींसारख्या नागरीकांना ताळ्यावर आणण्यासाठी अखेर राज्य सरकारने संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना विषयक सातत्याने माहिती देणे माझे कर्तव्य आहे , मी सर्वाना काळजीपोटीच आपल्याला या सुचना देतो. आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर …

Read More »

आरोग्य मंत्री म्हणाले, कोरोनाच्या ३ टप्प्यात जायचे नाही अन्यथा कठोर निर्णय राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ च्या घरात

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, नागरिकांनी गर्दी टाळावी. आत्ता कोरोना संसर्ग दुसऱ्या टप्प्यात आहे, तो तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये यासाठी उपाय योजना आखण्यात येत आहेत. मात्र नागरीकांनी गर्दी करणे टाळले नाही तर प्रसंगी कठोर निर्णय घेतले जातील असे सांगत रेल्वे, बससेवा बंद करण्याचे संकेत आरोग्यमंत्री …

Read More »

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवायचीय मग वाचा हे उपाय आयुर्वेदीक डॉक्टर शेखर मगर यांचा सल्ला

पावसाळा आला की ताप, थंडी, सर्दी, न्युमोनिया आदी आजारांचा सामना करावा लागतो. तर हिवाळ्यात सर्दी, कफचा त्रास यासह अन्य आजारांचा सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन, हिवताप, ताप येणे आदी सारख्या आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागतो. त्यामुळे ऋतु कोणताही असो पण जर माणसाच्या शरीराची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर …

Read More »

परदेशी प्रवास आणि लक्षणे असतील तरच कोरोना चाचणी होणार मुंबईसह ८ ठिकाणी चाचणी केंद्रे सुरु करणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

पुणेः प्रतिनिधी कोरोना व्हायरसची अनुषंगाने समाजात मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे एखादा परदेशी प्रवास करून आला असेल आणि एखाद्यामध्ये तशी लक्षणे दिसत असतील तरच त्या व्यक्तीची कोरोना व्हायरसची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एनआयव्ही फाऊंडेशन संस्थेला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …

Read More »

कोरोना औषधांची खोटी जाहीरात करणाऱ्यांवर कारवाई करणार अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी कोरोनासंदर्भांत शासन व्यापक प्रमाणात जनजागृती करीत असतांना विविध वस्तुंची निर्मिती करणारे काही उत्पादक आणि जाहिरातदार विशिष्ट प्रकारच्या गादीचा/सोफ्याचा वापर केल्यास किंवा विशिष्ट आयुर्वेदिक औषधांचे सेवन केल्यास कोरोनाचा प्रादूर्भाव होणार नसल्याच्या चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या उत्पादकांवर आणि जाहिरातदारांवर व जाहिरात प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांवर अन्न व औषध …

Read More »

खबरदार, मास्क, सँनिटायझरची साठेबाजी आणि काळाबाजार कराल तर जीवनाश्वक कायद्याखाली कारवाईचा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा इशारा

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे केंद्र सरकारच्या १३ मार्च, २०२० च्या अधिसूचनेन्वये जीवनावश्यक वस्तु अधिनियम, १९५५ च्या परिशिष्टामध्ये कलम २ ए अंतर्गत ‘मास्क (२ प्लाई व ३ प्लाई सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क) व हँन्ड सॅनेटाइझर यांचा समावेश जीवनावश्यक वस्तू म्हणून करण्यात आला आहे. या दोन वस्तुंचा काळाबाजार व …

Read More »

शासकिय कार्यालयांचे कमी संख्येत कामकाज चालविण्याचा विचार करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांची मदत आवश्यक मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कोरोना आजाराच्या अनुषंगाने आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात आला. मात्र परिस्थिती नियंत्रणात असली तरी गर्दी टाळण्याच्या उद्देशाने सरकारी कार्यालयात कमी उपस्थितीत कामकाज चालविण्याचा विचार सुरु असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगत या आजाराचा सामना करण्यासाठी नागरिकांच्या मदतीशिवाय शक्य होणार नसल्याने नागरीकांनी गरज असेल तरच बाहेर …

Read More »

मंत्रालयात प्रवेश बंदी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिन्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला बैठकीत निर्णय

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविणे यास सर्वोच्च प्राधान्य असून राज्य शासनाने उचललेल्या पावलांमुळे अद्याप तरी राज्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयात उद्यापासून सर्वसामान्य नागरीकांना प्रवेश बंदी करण्यात आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज झालेल्या आढावा …

Read More »