Breaking News

शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवायचीय मग वाचा हे उपाय आयुर्वेदीक डॉक्टर शेखर मगर यांचा सल्ला

पावसाळा आला की ताप, थंडी, सर्दी, न्युमोनिया आदी आजारांचा सामना करावा लागतो. तर हिवाळ्यात सर्दी, कफचा त्रास यासह अन्य आजारांचा सामना करावा लागतो. तर उन्हाळ्यात डिहायड्रेशन, हिवताप, ताप येणे आदी सारख्या आजारांचा सामना व्यक्तींना करावा लागतो. त्यामुळे ऋतु कोणताही असो पण जर माणसाच्या शरीराची प्रतिकार शक्ती जर चांगली असेल तर त्याच्यावर कोणत्याही आजाराच्या विषाणूंचा हल्ला होत नसल्याचे आयुर्वेदीक डॉक्टर शेखर मगर यांनी सांगितले.
आयुर्वेद आणि विषाणू:-
1) रोज सकाळच्या उन्हामध्ये बसल्यानंतर सगळे बॅक्टेरीया/व्हायरस मरतात किंवा निष्क्रिय होतात किंवा त्यांची तीव्रता कमी होते. त्यामुळे रुग्णाला Quarantine करुन घरात ठेवणे सोबतच त्या रुग्णाला नैसर्गिक वातावरणामध्ये उन्हामध्ये बसवावे व त्या रुग्णापासून योग्य ते अंतर ठेवावे.
2) उन्हामध्ये दररोज बसल्यामुळे निरोगी व्यक्तींना देखील नैसर्गिकरित्या Vit. D व्हिटामीन डी मिळेल.
3) स्वस्थ व्यक्तींनी दररोज सकाळी किमान 20 मिनिटे योगाभ्यास करावा.
4) दररोज सकाळी एक आवळा खावा, ज्यांना आवळा उपलब्ध नसेल त्यांनी किमान दोन चमचे चव्यनप्राश सेवन करावा.
5) आले (अद्रक/सुंठ) टाकून उकळलेले पाणी दिवसभर कोमट करुन प्यावे.
6) संध्याकाळी झोपताना दुधामध्ये हळद टाकून किमान 20 मिनिटे अर्क उतरेपर्यंत उकळावे व त्यांनतर ते दुध प्यावे.
7) तुळशी, स्वरस, अडुळसा, कंटकारी, जेष्ठमध, दारुहरिद्रा, सितोपलादी चूर्ण, तालीसाठी चूर्ण यांचे वैद्याच्या सल्ल्याने सेवन करावे.
8) अशा प्रकारे रोग प्रतिकार शक्ती (Immunity Power) वाढून सशक्त शरीरासोबत सशक्त मनही तयार होईल. तर चला आपण सर्वजण मिळून आयुर्वेदीय जीवन शैलीचा अंगीकार करुन केवळ कोरोना व्हायरसच नाही तर इतरही आजारांपासून मुक्ती मिळवूया.

डॉ.शेखर मगर (आयुर्वेदाचार्य) (B.A.M.S- Pune)
मो.क्र.9892223808

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *