Breaking News

आरोग्य

तंबाखूमुक्त महाराष्ट्र करूया आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण कार्य करावयास हवे. तंबाखू विरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रूजविणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने …

Read More »

माजी आरोग्यमंत्री डॉ. सावंतांनाही वास्तव कुपोषणाचे? दिसलेच नाही

कादंबरीतही आदिवासी उपेक्षितच राहील्याचा समर्थन स्वंयसेवी संस्थेचा आरोप   ‘वास्तव कुपोषणाचे’ या माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लिहिलेली ११६ पानांची कादंबरी दि. ४ फेब्रुवारीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित झाली. या कादंबरीची सुरुवात आदिवासी समाजातील अंधश्रद्धा,  रुढी व चालीरीती तसेच त्यांच्यामध्ये असलेली व्यसनाधीनता अशी करण्यात आली व हेच कुपोषणाचे मुख्य कारण …

Read More »

राज्यातील जनतेला आता मिळणार पंतप्रधान आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ

राज्यात संयुक्तपणे राबविण्याचा  मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : प्रतिनिधी राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ मिळावा यासाठी पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना संयुक्त पद्धतीने राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. ही योजना विमा (Insurance) आणि हमी (Assurance mode) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान जन …

Read More »

गोवर- रुबेला लसीकरण मोहिम सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सहा आठवडे लसीकरण मोहिम राबविणार असल्याची आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यात गोवर, रुबेला या आजारांवर नियंत्रण ठेवणाèया लसीकरण मोहिमेचा उद्या दिनांक २७ नोव्हेंबरपासून शुभारंभ करण्यात येत असून ही मोहिम राज्यात सहा आठवडे चालणार आहे. ९ महिने ते १५ वर्ष वयोगट, अंगणवाडीतील मुले, मुली व शाळाबाह्य मुलांना गोवर आणि रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील साधारण ३ …

Read More »

दुर्गम भाग आणि झोपडपट्ट्यांसाठी ‘फिरते दवाखाने मुंबईसाठी ५ फिरते दवाखाने, एकुण १० फिरत्या दवाखान्यांचे लोकार्पण

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. ‘फिरते वैद्यकीय उपचार केंद्र’ (Mobile Medical Unit) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा १० फिरत्या वैद्यकीय वाहनांचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते …

Read More »

महाराष्ट्राला तंबाखू मुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची अंमलबजावणी करा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व जिल्ह्यात कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद व्हावेत यासाठी पोलीसांनी या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आयोजित बैठकीत दिले. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा २००३(कोटपा) कायद्यांतर्गत महाराष्ट्र तंबाखूमुक्त …

Read More »

लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबेसिटी मंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई : प्रतिनिधी लठ्ठपणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो, त्याला त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले. राजभवन येथे विश्वकर्मा …

Read More »

स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी व्यावसायिकांनी प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक

मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर २४ तासात ताप कमी न झाल्यास …

Read More »

आरोग्य सांभाळयचे तर आहारात फळे महत्वाची रोज फळे खाल तर आरोग्य टीकेल

आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये ९० ते ९५ टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन – प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन …

Read More »

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील २० टक्के रक्कम डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या एकूण विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच विमा रकमेतील २५ टक्के रक्कम प्रतिवर्षी शासनाला …

Read More »