Breaking News

गोवर- रुबेला लसीकरण मोहिम सरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम सहा आठवडे लसीकरण मोहिम राबविणार असल्याची आरोग्यमंत्री डॉ.सावंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात गोवर, रुबेला या आजारांवर नियंत्रण ठेवणाèया लसीकरण मोहिमेचा उद्या दिनांक २७ नोव्हेंबरपासून शुभारंभ करण्यात येत असून ही मोहिम राज्यात सहा आठवडे चालणार आहे. ९ महिने ते १५ वर्ष वयोगट, अंगणवाडीतील मुले, मुली व शाळाबाह्य मुलांना गोवर आणि रुबेला लसीकरण करण्यात येणार आहे. या मोहिमेत राज्यातील साधारण ३ कोटी ३७ लाख विद्याथ्र्यांना लसीकरण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानभवनातील पत्रकार कक्ष येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचा आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण या विभागामार्फत तर नगरविकास, आदिवासी विकास, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक या विभागांच्या सहकार्याने ही मोहिम राबविण्यात येणार आहे असे सांगुन ते पुढे म्हणाले, गोवर हा अत्यंत संक्रमक आणि घातक आजार आहे. २०१६ च्या आकडेवारीनुसार गोवर आजारामुळे देशात ४९ हजारांहून अधिक मुले दरवर्षी मृत्युमुखी पडत आहेत. या आजारामुळे न्यूमोनिया, मेंदुज्वर, अतिसार, कानाचे आजार इत्यादी आजार होतात. तर, रुबेला हा त्या मानाने सौम्य आजार आहे. मुलांना तसेच प्रौढ व्यक्तींना हा आजार होतो. परंतु, जर गर्भवती स्त्रियांना या आजाराचा संसर्ग झाला तर त्यामुळे अचानक गर्भपात जन्मतः मृत बालक जन्माला येणे असे दुष्परिणाम आढळून येतात. तसेच, जन्माला येणाèया बालकाला अंधत्व, बहिरेपण, हृद्यविकृती होऊ शकते. त्यामुळे या आजारांपासून मुले. माता यांचे संरक्षण करण्याकरता ही मोहिम राबविण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
सहा आठवड्यांच्या या मोहिमेमध्ये पहिले दोन आठवडे शाळांमधून लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतरच्या दोन आठवड्यात अंगणवाडी तसेच मोबाईल टिमद्वारे बाह्यसंपर्क लसीकरण सत्रे राबविण्यात येणार आहे. तर, उर्वरीत दोन आठवड्यात ज्या मुलांना लसीकरण झाले नाही त्या बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, एनएमएम यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी, मोबाईल टिम, सरकारी रुग्णालये आणि आरोग्य केमद्रात हे लसीकरण सत्र राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लसीकरणातून कोणत्या बालकांना वगळण्यात येणार

  • बालकांना खूप ताप आला असेल अथवा गंभीर आजार (उदा.बेशुध्द पडणे, आकडी येणे इ.) झाला असेल तरच.
  • बालक रूग्णालयात दाखल झाले असेल तर
  • बालकाला यापूर्वी गोवर-रूबेलाच्या लसीची तीव्र अँलर्जी होत असेल तर.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *