Breaking News

पेन्शनवाढीसाठी अर्ज भरला? नसेल तर लगेच भरा, जाणून घ्या किती पगारावर किती मिळणार निवृत्तीवेतन

जर तुम्ही १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPFO ​​चे सदस्य असाल आणि त्यानंतरही सदस्य राहिल्यास तुमच्याकडे निवृत्तीनंतरही जास्त पेन्शन मिळवण्याचा पर्याय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने (EPFO) ने उच्च निवृत्ती वेतनासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २६ जूनपर्यंत वाढवली आहे. खरं तर जर तुम्ही खासगी नोकरीत असाल आणि तुमचे पैसे भविष्य निर्वाह निधी (PF) मध्ये कापले जातात, तसेच तुम्ही १० वर्षे काम केले असल्यास तुम्ही या पेन्शनसाठी पात्र आहात. तुमच्या पीएफ खात्यात जमा केलेल्या रकमेचा एक भाग पेन्शन फंडासाठी कर्मचारी पेन्शन स्कीम (EPS) मध्ये जातो.

सामान्य पेन्शन योजनेव्यतिरिक्त केंद्र सरकारने आता उच्च पेन्शनचा पर्यायही दिला आहे. जे कर्मचारी १ सप्टेंबर २०१४ पूर्वी EPF चे सदस्य होते आणि त्यानंतरही सदस्य राहिले ते उच्च निवृत्ती वेतन पर्यायासाठी पात्र आहेत. या अंतर्गत तुम्हाला तुमच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या ८.३३ टक्के (लागू असल्यास) कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) योगदान देण्याचा पर्याय असेल. विशेष म्हणजे जर तुम्ही जास्त पेन्शनचा पर्याय निवडला असेल तर EPFO ​​तुमच्या PF खात्यातून EPS ची रक्कम कापून घेईल. हे तुमच्या या योजनेत सामील होण्याच्या तारखेवर किंवा १ नोव्हेंबर १९९५ यापैकी ज्यांनी योगदान दिले असेल त्यावर आधारित असेल. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाल्यास दर महिन्याला कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराच्या १२ टक्के + DA पीएफ खात्यात जमा केला जातो. नियोक्त्याचे योगदानदेखील केवळ १२ टक्के आहे. कंपनीने केलेल्या योगदानापैकी ८.३३ टक्के रक्कम कर्मचारी पेन्शन फंड (EPS) मध्ये जाते आणि उर्वरित ३.६७ टक्के रक्कम पीएफ खात्यात जाते. सध्याच्या नियमांनुसार, पेन्शनपात्र वेतनाची कमाल मर्यादा १५ हजार रुपये आहे. या प्रकरणात १५००० X ८.३३/१०० = १२५० रुपये दरमहा त्याच्या पेन्शन खात्यात जातील. परंतु नवीन मर्यादेत पेन्शनपात्र वेतनाच्या कमाल मर्यादेवर पेन्शन न करता सध्याच्या मूळ पगारावर केली जाईल.

तसेच ईपीएफओने अद्याप उच्च पेन्शन पर्यायासाठी कोणतेही नवीन कॅल्क्युलेटर दिलेले नाही; परंतु जुन्या कॅल्क्युलेटरच्या आधारे पाहिले तर त्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे.
कर्मचाऱ्याची मासिक पेन्शन = पेन्शनपात्र वेतन X पेन्शनपात्र सेवा /७०

समजा तुम्ही वयाच्या २५ व्या वर्षी नोकरी सुरू केली आहे आणि तुम्ही वयाच्या ५८ व्या वर्षी निवृत्त होत आहात. म्हणजेच तुमच्या नोकरीचा कालावधी ३३ वर्षे होता. EPS मधून बाहेर पडण्यापूर्वी तुमचा मागील ६० महिन्यांतील मूळ पगार १,००,००० रुपये आहे, असे गृहीत धरू या. EPS मधून बाहेर पडण्यापूर्वी मागील ६० महिन्यांतील कर्मचाऱ्याचा निवृत्ती वेतन हा त्याचा सरासरी मासिक पगार असतो. नवीन नियमात वास्तविक मूळ वेतनाच्या आधारावर पेन्शनची गणना केली जाते.

मासिक पेन्शन: १,००,००० X ३३/७० = ४७१४३ रुपये
मागील ६० महिन्यांचा मूळ पगार ५० हजार
मासिक पेन्शन: ५०,००० X ३३/७० = २३५७१ रुपये
जर एखाद्याचा मासिक पगार (गेल्या ६० महिन्यांच्या पगाराची सरासरी) १५ हजार रुपये असेल आणि नोकरीचा कालावधी २० वर्षे असेल तर….
मासिक पेन्शन: १५०००X २०/७० = ४२८६ रुपये
मासिक पेन्शन: १५०००X २५/७० = ५३५७ रुपये
मासिक पेन्शन: १५०००X ३०/७० = ६४२९ रुपये

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

बँकांना सलग ६ दिवस सुट्टी, यादी पहा सुट्ट्यांची यादी पहा

भारतात आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये अनेक दिवस बँकांना सुट्टी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *