Breaking News

ईशा देणार पाणी वाचवण्याचा संदेश सामाजिकतेच्या भान जपणाऱ्या कलावंताच्या यादीत आता ईशा गुप्ताचे नाव

मुंबई : प्रतिनिधी

आज बऱ्याच सेलिब्रिटीज एकीकडे ग्लॅमर विश्वात वावरत असताना दुसरीकडे समाजामध्ये विविध प्रश्नांवर जनजागृती करण्याचं कामही करीत आहेत. या सेलिब्रिटीज शासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करताना आपल्या ग्लॅमर आणि लोकप्रियतेचा उपयोग लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी करीत असताना समाजोपयोगी कार्यांनाही हातभार लावत आहेत. आजच्या हॅाट अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट असणारी ईशा गुप्ताही या कामात हिरीरीने सहभागी झाली आहे. ईशा सध्या पाणी वाचवण्याचे धडे देत आहेत.

ईशाने आजवर बऱ्याच सोशल मुद्द्यांसाठी जनतेचं मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. याच वाटेवरील पुढचं पाऊल टाकत ईशाने पर्यावरण संवर्धनाचा वसाही घेतला आहे. प्राण्यांचा बचाव करण्याचा संदेश देणाऱ्या ईशाने स्त्रियांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केलं आहे. आता ती पाणी आणि पाण्याच्या स्रोतांचा बचाव करण्यासाठी एक कॅम्पेनिंग सुरू करणार आहे. हे कॅम्पेन दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर कसा करावा आणि कशा प्रकारे पाणी वाचवावं याचा संदेश देणारं असल्याचं ईशाचं म्हणणं आहे. गाव-खेड्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांना पाण्याच्या शोधार्थ मैलोन् मैल पायपीट करावी लागते. या तुलनेत शहरांतील लोकांना पाणी मुबलक प्रमाणात मिळतं. त्यामुळे कित्येकदा पाण्याचा गैरवापरही होतो. निष्काळजीपणे पाणी वापरलं जातं. आज आपण जर पाणी वाचवलं नाही तर भविष्यात खूप मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. ही गरज ओळखून आपण हे कॅम्पेन सुरू केल्याचं ईशा मानते.

एनजीओंच्या सहाय्याने ईशा हे कॅम्पेन विविध शहरांमध्ये पोहोचवणार आहे. यासाठी तिने काही शहरांची पाहणीही केली. तिथले नागरिक पाण्याचा कशा प्रकारे वापर करतात आणि गावातील जनता पाण्यासाठी व्याकूळलेली असते हे चित्रही तिने जवळून पाहिलं आहे. यातूनच पाणी वाचवण्याचा संदेश मनामनात रुजवण्यासाठी पुढाकार घेण्याचा निश्चय ईशाने घेतल्याचं सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजतं.

 

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *