Breaking News

‘शिकारी’मध्ये मृण्मयीचं सरप्राइज पॅकेज सामान्य आणि उनाड बुध्दीच्या नायिकेची भूमिका

मुंबई : प्रतिनिधी

कोणत्याही प्रकारच्या भूमिकेला न्याय देण्याची क्षमता असणाऱ्या मृण्मयीने नेहमीची विविधांगी व्यक्तिरेखा साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. अभिनयापासून चित्रपट निर्मितीपर्यंतच्या आजवरच्या तिच्या प्रवासावर नजर टाकल्यास सहजपणे याची जाणिव होते. आता पुन्हा एकदा मृण्मयी एका नव्या रूपात प्रेक्षकांना भेटण्यासाठी सज्ज झाली आहे. काहीशा बोल्ड टीझरमुळे अनपेक्षितपणे सर्वाचं लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शिकारी’ या आगामी मराठी सिनेमात मृण्मयीचा नवा लुक दिसेल.

महेश वामन मांजरेकर प्रस्तुत आणि विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ २० एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या मराठी चित्रपटातील मृण्मयी हे सरप्राईज पॅकेज असल्याचं सांगितलं जात आहे. मृण्मयीच्या आजवर गाजलेल्या भूमिका खूप सोज्वळ किंवा शहरी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे तिला शिकारी सिनेमातील भूमिका सांगताना तिच्या होकाराबद्दल विजू थोडा साशंक होता. याबाबतचं कारण सांगताना विजू म्हणाला की, बऱ्याच बुद्धीजीवी भूमिका पडद्यावर जिवंत केल्यानंतर तशा अर्थाने सामान्यबुद्धी आणि उनाड मुलीची भूमिका करण्याची डेअरिंग करण खूप जिकिरीच होतं. याशिवाय कलाकार म्हणून आव्हानात्मकसुद्धा. पण तिने जितक्या सकारात्मक दृष्टीने या भूमिकेकडे पाहिलं ते पाहून मला वाटलं की ती अभिनेत्री म्हणून समृद्ध होत असतानाच प्रगल्भ होतेय. अमुक एक भूमिका त्यासाठी अमुक एक देहबोली, भाषा, उच्चार पुन्हा त्यातली सहजता. सगळ जमवून आणणं ही खरंच तारेवरली कसरत होती. पण तिला वृत्तीनेच साचेबद्ध काम करण पसंत नसल्याने तिने खरच ह्या भूमिकेत सुद्धा जीव ओतला आहे असंही विजू म्हणाला.

‘शिकारी’साठी काम करताना करताना एक वेगळा अनुभव आल्याचं सांगत मृण्मयी म्हणाली की, आतापर्यंत मी पडद्यावर ज्या भूमिका केल्या आहेत, त्यापेक्षा ही वेगळी भूमिका आहे. माझी जी वेगळी इमेज आहे त्यापेक्षा या रोलमध्ये वेगळेपण होतं म्हणून मी हा रोल निवडला. याशिवाय महेश मांजरेकर आणि विजू माने यांच्यामुळेच मी या चित्रपटात आले. महेश मांजरेकर सरांनी जेव्हा या रोलविषयी विचारलं तेव्हा त्यांना नकार देऊ न शकल्याचं मृण्मयीने मान्य केलं.

महेश मांजरेकर यांनी ‘शिकारी’चे सादरीकरण केलं असून आर्यन ग्लोबल एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे विजय पाटील हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. नेहा खान, सुव्रत जोशी, भालचंद्र कदम, भरत गणेशपुरे, वैभव मांगले, कश्मीरा शाह, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव, संदेश उपश्याम, जीवन कराळकर आणि दुर्गेश बडवे यांच्याही या सिनेमात महत्वाच्या भूमिका आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *