Breaking News

‘राजा’ उलगडणार गायकरूपी नायकाचा संगीतमय प्रवास २५ मे ला येणार प्रेक्षकांच्या भेटीस

मुंबई : प्रतिनिधी

पूर्वीच्या काळी कलागुण अंगी असूनही स्वत:ला सिद्ध करण्यासाठी वेगळा संघर्ष करावा लागायचा. या संघर्षातून जो तरायचा तोच यशाच्या शिखरावर विराजमान व्हायचा, पण आज जमाना बदलला आहे. आजचा जमाना रिअॅलिटी शोजचा आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा आज स्पर्धा जरी वाढली असली तरी स्ट्रगलची पद्धत काहीशी बदलली आहे. असं असलं तरी तळागाळातील घटकांना स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजही प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. याच मुद्द्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘राजा’ या आगामी मराठी सिनेमात एका गायकाचा संगीतमय प्रवास पाहायला मिळणार आहे.

‘राजा’ सिनेमाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच संपन्न झाला. या निमित्ताने जणू शब्द-सुरांची अनोखी मैफल सजल्याचा अनुभव उपस्थितांनी घेतला. गायक सुखविंदर सिंग यांच्या रंगतदार लाइव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्यात रंग भरले. खासदार प्रीतमताई मुंडे, डॉ. अजिंक्य पाटील (अध्यक्ष – डी. वाय. पाटील ग्रुप), सुरेंद्र पांडे (पोलीस अप्पर महासंचालक, महाराष्ट्र राज्य), प्रवीण घुगे (अध्यक्ष – बालहक्क आयोग महाराष्ट्र शासन), संजय मुखर्जी (अतिरिक्त महानगर आयुक्त), संजय खंदारे (अतिरिक्त आयुक्त एमएमआरडीए), उद्योजक प्रवीण तलरेजा, गायक शान आणि उदित नारायण अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ‘राजा’ चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा पार पडला. दीपप्रज्वलन झाल्यानंतर पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते ‘राजा’चं संगीत प्रकाशित करण्यात आलं. येत्या २५ मे ला ‘राजा’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

या निमित्ताने उपस्थितांना २५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘राजा’तील गाण्यांची झलक अनुभवता आली. हा संगीतमय चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी व्यक्त केला. ‘सत्यसाई मल्टीमिडीया प्रा.लि’ या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माते प्रवीण काकड यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिले आहेत. ‘राजा’ या संगीतमय चित्रपटात ‘गावचा राजा’, ‘झन्नाटा’, ‘हंडीतला मेवा’, ‘जो बाळा जो जो रे’, ‘याद तुम्हारी आये’, ‘दगडाचे मन’, ‘हे मस्तीचे गाणे’, ‘आज सुरांना गहिवरले’ अशा वेगवेगळ्या जॉनरच्या आठ सुमधुर गाण्यांचा नजराणा आहे. वलय मुळगुंद, केदार नायगावकर, मिलिंद इमानदार यांच्या लेखणीने या चित्रपटातील गाणी सजली आहेत. सुखविंदर सिंग, शान, उदित नारायण या हिंदीतील दिग्गज गायकांसोबत रोहित राऊत, सौरभ साळुंखे, उर्मिला धनगर, सायली पडघन, मिलिंद शिंदे यांनी यातील गाणी गायली आहेत. या गीतांना पंकज पडघन यांनी संगीतबद्ध केलं आहे. पॉप सिंगरच्या आयुष्यावर ‘राजा’ ची कथा बेतली आहे. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे या तीन नव्या चेहऱ्यांसह शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *