Breaking News

मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दादासाहेब फाळके यांची जयंती उत्साहात साजरी ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरी, अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी

आपल्या देशात चलचित्राची मुहूर्तमेढ रोवत चित्रपटसृष्टीचा पाया उभारणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांची १४८ वी जयंती मराठी कलाकार-तंत्रज्ञांनी मोठ्या उत्साहात साजरी केली.

दादर येथील दादासाहेब फाळके चौकात जयंती साजरी करण्यासाठी जमा झालेल्या कलाकारांना पाहण्यासाठी रसिकांनीही खूप गर्दी केली. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे पदाधिकारी तसेच चित्रपटसृष्टीचे अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, विजू खोटे, अभिनेता अंकुश चौधरी, आदेश बांदेकर, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, निर्माता दिग्दर्शक सतीश रणदिवे, पितांबर काळे, विनय नेवाळकर, विजय खोचीकर, शरद चव्हाण, संजय ठुबे, चैत्राली डोंगरे, यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक रंगतदार झाला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दादासाहेब फाळके यांच्या कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या ज्योती निसळ लिखित ‘ध्येयस्थ श्वास’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दादासाहेब फाळके यांच्या जयंती निमित्ताने प्रकाशित झालेले हे पुस्तक त्यांना अनोखी मानवंदना ठरेल असं प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी यावेळी बोलताना केलं.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *