Breaking News
Great Indian house hunt: Despite his last OTT outing, Govinda Naam Mera, not doing well, Vicky Kaushal is undeterred. He will next be seen in Zara Hatke Zara Bachke, releasing on June 2. Its trailer was trending on YouTube, and Kaushal—who celebrated his 35th birthday on May 16—said it was the best birthday gift he could get. The film, directed by Laxman Utekar of Luka Chuppi fame, follows a couple whose marriage is deteriorating and who wants a divorce, but there is a catch. There is only one way to know whether it is dramatic, romantic or both, said Kaushal’s co-star Sara Ali Khan. By buying a ticket? | Amey Mansabdar

विकी कौशल साकारणार छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका

दिवाळीनिमित्त मनसेकडून यंदाही दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी सलीमखान आणि जावेद अख्तर यांनी केले. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्यानंतर आता दुसऱ्यादिवशी बॉलिवूडमधील दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी शिवाजी पार्कच्या दीपोत्सावाला हजेरी लावली.यावेळी राज ठाकरे यांनी या पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थित असलेल्या अभिनेता विकी कौशलबाबतहीराज ठाकरेंनी खुलासा केला.

अभिनेता विकी कौशल हा आगामी काळात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याचे राज ठाकरेंनी जाहीर केले. राज ठाकरे म्हणाले की, विकी कौशल याच्याबद्दल काय सांगण्याची गरज नाही, अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे, त्याचा पुढचा चित्रपट सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या सिनेमात धर्मवीर संभाजीच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. त्याचेही प्रमोशन आज नाही. मलाही आताच कळाले आहे. त्यामुळे सिनेमा खोटी दाढी नको म्हणून भूमिकेसाठी त्याने खरी दाढी वाढवली आहे असं राज यांनी सांगितले.

त्याचसोबत मी आज भाषण करायला आलो नाही, माझे मित्र माझ्या विनंतीला मान देऊन इथं आले. माझे मित्र राजकुमार हिरानी यांचा डिसेंबरमध्ये सिनेमा येतोय, त्याचे प्रमोशन नाही. दिवाळीसाठी मी त्यांना आमंत्रित केले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सलीम-जावेद करणार आहेत. त्यामुळे दुसऱ्यादिवशी तुम्ही आला तर मला आनंद होईल असं मी म्हटलं. त्यांनी माझ्या प्रेमाखातीर एक सेकंदाचाही वेळ न लावता आज इथं कार्यक्रमाला आले त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे असं राज ठाकरेंनी म्हटलं.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

‘आदिपुरुष’ ही माझी मोठी चूक, या दिग्दर्शकाने मान्य केली चूक या दिग्दर्शकाने अखेर मान्य केली चूक

आदिपुरुष या सिनेमावर जोरदार टीका झाली. या सिनेमातील डायलॉगवर प्रचंड वादविवाद झाले. या सर्व प्रकरणानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *