Breaking News

तुम्ही घरात ठेवू शकता इतके सोने, असा आहे आयकर नियम दिवाळीच्या सणात ही माहिती लक्षात असू द्या

भारतीय लोकांचे सोन्याबद्दलचे प्रेम जगजाहीर आहे. भारतीय लोक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहतात. प्रत्येक कुटुंब सोन्यात रक्कम गुंतवते असते. पण तुम्ही किती सोने घरात ठेवावे याबाबतही नियम आहेत. ठराविक मर्यादेपेक्षा सोने बाळगले तर तुम्ही अडचणीत याल. सोने घरात ठेवण्याबाबतचे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

किती सोने ठेवू शकतो

– विवाहित महिला ५०० ग्रॅम सोने स्वत:जवळ ठेवू शकते.
– अविवाहित महिला २५० ग्रॅम सोने स्वत:जवळ ठेवू शकते.
– एक माणूस १०० ग्रॅम सोने सोबत ठेवू शकतो.

तुम्ही उघड केलेल्या उत्पन्नातून सोने खरेदी केले तर कर लागणार नाही. याशिवाय तुम्ही घरगुती खर्चात बचत करून, शेतीतून कमावलेल्या पैशातून सोने खरेदी केले असेल किंवा तुम्हाला सोने वारसाहक्काने मिळाले असेल,तर त्यावरही कर द्यावा लागणार नाही. तुमचे सोने कोठून आले आणि ते कोणत्या उत्पन्नातून खरेदी केले गेले याची माहिती तुम्हाला माहीत असेल, तर तुम्ही सोन्याच्या साठवणुकीबाबत सुरक्षित आहात.

सोने खरेदीवर कर नाही. पण तुम्ही ठेवलेले सोने विकल्यास कर भरावा लागेल. सोने तीन वर्षे ठेवल्यानंतर ते विकले तर तुम्हाला या विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर २० टक्के दीर्घकालीन भांडवली नफा कर भरावा लागेल. तसेच तुम्ही सोने खरेदी केल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास त्यातून मिळणारे उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाईल आणि तुम्ही करदाते म्हणून ज्या टॅक्स स्लॅबमध्ये येत आहात त्यानुसार त्यावर कर आकारला जाईल.

मर्यादेत सोने घरात ठेवले असल्यास तपासात ते जप्त करता येत नाही. मात्र हा नियम कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ठेवलेल्या सोन्यावरच लागू होईल. कुटुंबात इतर कोणाचे सोने ठेवले असल्यास ते जप्त केले जाऊ शकते. जोपर्यंत तुम्ही उत्पन्नाचा स्रोत सिद्ध करू शकता तोपर्यंत तुमचे सोने सुरक्षित आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

देशातील ३ सरकारी बँकांनी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एफडीवर व्याज वाढवले असे आहेत व्याजदर

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक यांनी अलीकडेच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *