Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंची स्पष्टोक्ती, लॉकडाऊनबाबत दोन दिवसात निर्णय मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळण्याचेही केले आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या आधीच राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होवू लागल्याचे दिसून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावायचा कि नाही याचा निर्णय राज्यातील जनतेवर सोडला. परंतु, मुंबईसह विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आणि पुणे विभागात सातत्याने बाधित रूग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिथे आवश्यक असेल तिथे आता लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय पुढील एक दोन दिवसात घेणार असल्याचे स्पष्टोक्ती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी जे.जे. रुग्णालय येथे जाऊन कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस घेतली. यावेळी रश्मी ठाकरे, श्रीमती मीनाताई पाटणकर तसेच शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील लस घेतली. यावेळी मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी उपस्थित होते. लस घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

लस घेण्यात कोणतीही भीती नाही. कोरोनावरील धोका वाढतो आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस आल्यामुळे या रोगापासून आपणास संरक्षण मिळणार आहे. या लसीचे काही दुष्परिणाम नसून जे पात्र आहेत त्या प्रत्येकाने ती घ्यावी. लस हे संरक्षण असले तरी सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे, हात धूत राहणे आणि सुरक्षित अंतर ठेवणे हे तितकेच महत्वाचे आहे. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.

काही दिवसांपासून संसर्गात मोठी वाढ होत असून परिस्थिती सुधारली नाही तर आवश्यकतेनुसार काही ठिकाणी नाईलाजाने कडक लॉकडाऊन लावावा लागेल, असेही ते म्हणाले.

राज्यातील वाढती कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्या त्या भागातील स्थानिक प्रशासनाला अधिकार यापूर्वीच राज्य सरकारने दिले. मात्र तरीही अनेक भागात कडक निर्बंध घालूनही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे आता कडक निर्बंधांबरोबर लॉकडाऊन लावाल्याशिवाय वाढत्या संख्येला अटकाव घालणे शक्य होणार नसल्याचे मत आरोग्य विभागातील अधिकांऱ्यांनी खाजगीत व्यक्त केले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *