Breaking News

निवृत्तवेतनातून पती-पत्नी शिक्षकांनी दिले कोरोना विरोधी लढ्याला १ लाख मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली रक्कम

सोलापूर / नातेपुते:प्रतिनिधी
संपूर्ण जगभरासहीत देशात, राज्यात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुल्ला मुलाणी समाजाचे सदस्य सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नजमा मुल्ला व त्यांचे पती उप प्राचार्य शाहानुर मुल्ला यांनी सेवानिवृत्ती वेतनातून “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” म्हणून एक लाख रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून दिले आहेत. हे दोघेही सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत होते.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले. कोरोना विषाणूच्या लढाईसाठी बळ म्हणून ज्या नागरीकांना छोट्या, मोठ्या प्रमाणावर दान करायचे आहे त्यांनी “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” ला आपले योगदान द्यावे असे आवाहन केले आहे. या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सध्या कोरोना ग्रस्तांचा वाढता आकडा पाहून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील डॉ. बाळकृष्ण जयवंत दाते प्रशाळा व कनिष्ठ महाविद्यालय च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका नजमा मुल्ला व त्यांचे पती उपप्राचार्य शाहानुर मुल्ला यांनी आपल्या निवृत्ती वेतनातून नातेपुते येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचा एक लाख रुपये रकमेचा धनादेश “मुख्यमंत्री सहायता निधी (कोविड-19)” म्हणून बँकेत भरण्यासाठी बँकेचे व्यवस्थापक रुपनवर यांना दिला.
अनेक गरीब लोकांची, कष्टकऱ्यांची, हातावरचे पोट असलेल्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला पुढे येऊन ज्यांना मदत करणे शक्य होईल त्यांनी मदत करावी असे आव्हान शाहानूर मुल्ला व त्यांची पत्नी यांनी केले.

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *