Breaking News
sybolic photo

CAA विरोधी आंदोलकांच्या रेट्यापुढे पोलिसांची माघार राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनास दिली २० मिनिटांची परवानगी

कल्याणः प्रतिनिधी
संपुर्ण देशभरात CAA अर्थात केंद्राच्या नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही भारताचे लोक समितीतर्फे येथील डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार होती. सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलनास परवानगी नाकारली. मात्र आंदोलनकर्त्ये नियोजित जमा होवू लागल्याने अखेर पोलिसांनीच माघार घेत आंदोलनकर्त्यांना अवघ्या २० मिनिटांची परवानगी दिली.
नागरीकत्व कायद्याच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी कल्याणमधील सुक्षिशित तरूण, वकील, सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली. पोलिसांनी होय- नाही करत या आंदोलकांना अखेर परवानगी नाकारली. परंतु आंदोलनकर्त्ये आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. तसेच नियोजित वेळेत हे सर्व आंदोलनकर्त्ये शिवाजी चौकातील डॉ. आंबेडकरांच्या पुतळा असलेल्या उद्यानात जमा होण्यास सुरुवात केली.
पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने या उद्यान परिसराला पोलिसी छावणीचे स्वरूप आले. अखेर पोलिसांच्या दडपशाहीला जुमाणायचे नाही म्हणून शेकडो आंदोलनकर्त्यांनी उद्यान परिसरात जमा होण्यास सुरुवात केली. अखेर आंदोलनकर्त्यांच्या रेट्यापुढे अखेर पोलिसांनीही माघार घेत राज्यघटनेच्या उद्देशिका वाचनास २० मिनिटांची परवानगी दिली. परंतु त्यानंतर या सर्व आंदोलनकर्त्यांना अटक करून त्यांना पुन्हा नंतर सोडून दिले. उद्यानात पाच दिवसीय आंदोलनाची परवानगी “आम्ही भारतीय लोक” या समितीने मागितली होती.पोलिसांनी महापालिका आयुक्त यांना परवानगी देऊ नये म्हणून पत्र दिले होते. त्यामुळे महापालिकेने उद्यानाची जागा देण्यास नकार दिला.

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *