Breaking News

अब्दुल सत्तारांच्या हक्कालपट्टीवरून विरोधकांनी दोन्ही सभागृहाचे कामकाज बंद पाडले मंत्री अब्दुल सत्तार यांची हकालपट्टी करा ; महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होत वेलमध्ये बसून जोरदार निदर्शने...

वाशिम येथील गायरान जमिनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढत पदाचा दुरूपयोग केल्याचा ठपका ठेवला. यासंपूर्ण प्रकरणाची पोल खोल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. त्यानंतर विधान परिषदेत सभापती आणि विधानसभेत अध्यक्ष राहुल …

Read More »

अजित पवार यांनी काढला अब्दुल सत्तारांचा जमिन घोटाळा, हकालपट्टीच्या मागणीवरून गोंधळ विरोधक आक्रमकः सभागृहाचे कामकाज पाच वेळा तहकूब

सर्वोच्च न्यायालयाचा व राज्य सरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून देत मंत्री पदाचा दुरुपयोग केला आहे. ही बाब अतिशय गंभीर असून याप्रकरणाची जबाबदारी स्वीकारुन अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा दिला पाहिजे त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी …

Read More »

ग्रामविकास विभागातील पदे तत्काळ भरणार -ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची विधानसभेत माहिती

ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी ग्रामविकास विभागातील १३ हजार ४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्यासाठी तत्काळ ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगा व दापका या दोन गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी …

Read More »

अजित पवारांचा टोला, सोयीचे आहे ते चालतंय बाकीचं आमच्यावर द्या ढकलून, वाह रे पठ्ठे अब्दुल सत्तार प्रकरणी भाजपाला अजित पवारांचा टोला

नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारमधील विद्यमान कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात महसूल राज्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी नियमबाह्य पध्दतीने गायरान जमिनचे वाटप केले. त्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाने अब्दुल सत्तार यांच्यावर ताशेरे ओढत सत्तार यांचा निर्णय रद्दबातल ठरविला. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत स्थगन …

Read More »

अजित पवार म्हणाले, फडणवीसजी तुम्ही मनावर घेतले तर ते लगेच होईल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घ्या

विधानसभेचे नियमित कामकाज सुरु झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याबाबतची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सकाळी केली. तसेच मागील ३५ वर्षापासून जयंत पाटील हे सभागृहाचे सदस्य असून जे व्हायला नको ते झाले. त्यामुळे जयंत पाटील यांच्यावरील करण्यात आलेली निलंबनाची कारवाई मागे घ्यावी अशी …

Read More »

गली गली मे शोर है खोके सरकार चोर है सहाव्या दिवशीही महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक ; विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी...

बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… महाराष्ट्राची पिळवणूक, गुजरातमध्ये गुंतवणूक… राजीनामा द्या राजीनामा द्या ,मुख्यमंत्री राजीनामा द्या… द्या खोके, भूखंड ओके… घेतले खोके माजलेत बोके… कर्नाटक सरकार हाय हाय… मिंथे सरकार हाय हाय… निर्लज्ज सरकार हाय हाय… राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव… गली गली मे शोर है खोके सरकार चोर …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, जाहिर केल्याप्रमाणे सीमाप्रश्नी विधेयक का आणले नाही? सीमावादावर ठराव आणण्याबाबत विरोधक आक्रमक, देवेंद्र फडणवीसांची माघार

कर्नाटक सरकारने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विरोधात पुन्हा एकदा भूमिका मांडली. मात्र मुंबईत झालेल्या संसदीय कामकाज सल्लागार समितीत सीमाप्रश्नी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेत ठराव मांडून तो मंजूर करण्याचे ठरले. मात्र दुसरा आठवडा सुरु झाला तरी अद्याप ठराव का आणला जात नाही असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला. विधानसभेचे …

Read More »

संजय राऊत यांचे फडणवीसांना आव्हान,… तर बिल्डर सूरज परमार प्रकरणीही एसआयटी लावा दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांची मागणी

फडणवीस सरकारच्या काळात ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी सूसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. त्यानंतर परमार यांची डायरी सापडली. त्यात अनेक राजकिय व्यक्तींची सांकेतिक भाषेत लिहिलेली नावे आढळून येत त्या व्यक्तींना पैसे दिल्याची माहिती उघडकीस आली. तसेच त्यातील काही नावे खोडा-खोड केल्याचेही उघडकीस आले होते. मात्र दिशा सालियन प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

नारायण राणे यांचा आदित्य ठाकरेंना इशारा, तुला सोडणार नाही… दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिला पुन्हा इशारा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियन हीचा मृत्यू झाला. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर सूचक शब्दात आरोप करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर शिवसेनेकडून त्यास प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणावरून शिंदे …

Read More »

सुषमा अंधारे यांचा सवाल, बापू सूतगिरणी, दुधसंघ, क्रेडिट सोसायटी स्थापन केलेली कुठेय? सोलापूरच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांचा घणाघात

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सध्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघाबरोबरच भाजपा आमदारांच्या मतदारसंघात ही जाहिर सभा घेत आहेत. या अनुषंगाने सुषमा अंधारे या आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच आयोजित जाहिर सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाले, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सूतगिरणी काढली, सरकारकडून जमिन मिळवली, …

Read More »