Breaking News

नारायण राणे यांचा आदित्य ठाकरेंना इशारा, तुला सोडणार नाही… दिशा सालियन मृत्यूप्रकरणी दिला पुन्हा इशारा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका दिशा सालियन हीचा मृत्यू झाला. त्यानंतर भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंवर सूचक शब्दात आरोप करत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यानंतर शिवसेनेकडून त्यास प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणावरून शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुद्दा उपस्थित करत एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करत गदारोळ घातला. त्यानंतर आता पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करत तुला सोडणार नसल्याचा इशारावजा धमकी दिली.

दिशा सालियनचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. तिने आत्महत्या केली की तिच्यासोबत घातपात घडला? याबाबत अद्याप संभ्रम आहे. दिशाच्या मृत्यूनंतर सुशांतसिंह राजपूतही राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. दोघांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं.

या प्रकरणामध्ये शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचा हात आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणे यांनी यापूर्वी केला होता. यानंतर आता राणेंनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंवर आरोप केले. दिशा सालियनवर तू अत्याचार केला. तिची हत्या केली, तुला सोडणार नाही, असं विधान नारायण राणेंनी केलं आहे. ते सिंधुदुर्ग येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र सोडताना नारायण राणे म्हणाले, सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियानचं नाव आलं की आदित्य ठाकरे चवताळले. आज नाहीतर उद्या… पण तुला तुरुंगात नक्की पाठवणार. दिशा सालियन या एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन मुलीवर तू अत्याचार केला आहे, तू हत्या केली आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे तिथं उपस्थित होते. तुला सोडणार नाही. आता भाजपा आणि शिंदे गटाची सत्ता आहे, एवढं लक्षात ठेवा, असा गंभीर इशाराही नारायण राणे यांनी दिला.

Check Also

राजकीय पक्ष व उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे

राजकीय पक्षांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक, २०२४ च्या कालावधीमध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे.निवडणूक काळामध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *