Breaking News

संजय राऊत यांचे फडणवीसांना आव्हान,… तर बिल्डर सूरज परमार प्रकरणीही एसआयटी लावा दिशा सालियन मृत्यूप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशीची घोषणा केल्यानंतर संजय राऊत यांची मागणी

फडणवीस सरकारच्या काळात ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांनी सूसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. त्यानंतर परमार यांची डायरी सापडली. त्यात अनेक राजकिय व्यक्तींची सांकेतिक भाषेत लिहिलेली नावे आढळून येत त्या व्यक्तींना पैसे दिल्याची माहिती उघडकीस आली. तसेच त्यातील काही नावे खोडा-खोड केल्याचेही उघडकीस आले होते. मात्र दिशा सालियन प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यानंतर आज संजय राऊत यांनी ठाण्यातले बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गंभीर आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली.

त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. ही असली मागणी हा अत्यंत केविलवाणा प्रकार आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

सुरज परमार यांच्या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी होते आहे ही मागणी उद्धव ठाकरे गटाने केली आहे. हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे. सगळ्या चौकशांना आम्ही सामोरं जाऊ शकतो. आमचं पारदर्शक सरकार आहे. ठाकरे गटाला फक्त आरोप करत राजकारण करायचं आहे. एक आरोप केला होता त्यात तोंडघशी पडले. न्यायालयाने त्यांना जागा दाखवली असंल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.

संजय राऊत हे आज रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी परमार आत्महत्येप्रकरणी एसआयटी चौकशीची मागणी केली.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत, असं सूचक वक्तव्य करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

संजय राऊत म्हणाले, आमचे खासदार अरविंद सावंत यांनी एक विषय मांडला. ठाण्यातील एक बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येनंतर जी डायरी सापडली त्या डायरीत सांकेतिक नावं आहेत. ती नावं कोणाची आहेत ती आम्हाला माहिती आहेत. लावा त्यांच्याविरोधात एसआयटी चौकशी. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे आणि भाजपा त्यांना पाठीशी घालत आहे. लावा चौकशी, करा एसआयटी असे आव्हानच भाजपाला दिले.

राज्यपालांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अपमानाच्या वक्तव्यांची एक मालिकाच चालवली आहे. असं होऊनही भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावर बसून आहेत आणि भाजपा त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी यावरच स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे. मात्र, ते तसं करत नाहीत. ते विरोधी पक्षांवर एसआयटी लावत आहेत. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आलं नव्हतं, अशी टीकाही त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *