Breaking News

Editor

मुख्यमंत्री शिंदे यांचा नाव घेता उध्दव ठाकरेंना टोला, अडीच वर्षापूर्वीच हा… द्रोपदी मुर्म यांच्या पाठिंब्याच्या निर्णयानंतर लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावित महाविकास आघाडी सरकारला खाली खचले. त्यानंतर तरीही आपण शिवसेनेतच आहोत असे वांरवार सांगत महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी समझौता करण्यासाठी एकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न त्या ५० बंडखोर आमदारांकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी …

Read More »

महेश तपासेचा केसरकरांवर पलटवार; बेकायदेशीर प्रवक्त्यांचे बेजाबदार वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्युत्तर

दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी शिवसेना फुटीमागे शरद पवार हेच होते असा खळबळजनक आरोप करत नारायण राणे, राज ठाकरे आणि छगन भुजबळ यांच्या बंडामागे तेच होते. तसेच ही माहिती आपणास शरद पवार यांनीच दिल्याचा दावा केला. या आरोपावरून राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे …

Read More »

काँग्रेसचा इशारा; ज्वलंत प्रश्नांकडे वेळीच लक्ष दया अन्यथा परिस्थिती स्फोटक बनेल श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची-अतुल लोंढे

केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे हे देशाच्या हिताचे नाही. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार मात्र आकड्यांचा खेळ करून आभासी व दिशाभूल करणारे चित्र दाखवत आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले …

Read More »

दिपक केसरकर यांचा आरोप: मला पवारांनीच सांगितले, शिवसेना फुटी मागे ते स्वत: राज ठाकरे, नारायण राणे आणि छगन भुजबळांच्या बंडामागे शरद पवार

सध्या दिल्ली दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर काही प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले की, शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा त्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचा हात होता असा खळबळजनक आरोप केला. मी राष्ट्रवादीत होतो, त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या …

Read More »

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली मोठी घोषणा; ७५ दिवस मोफत लस अमृत महोत्सवी वर्षानंतर ७५ दिवस मोफत लस मिळणार

मागील दिड ते दोन वर्षे कोरोनाला रोखण्यासाठी लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्र आवश्यक करण्यात आली. नागरिकांच्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या योग्य खबरदारीमुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर आता तिसरी लस अर्थात बुस्टर लस घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देश …

Read More »

मुंबई महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी; शरद पवार यांचे निर्देश सोबत कोणी येईल याचा विचार करू नका कामाला लागा

राज्यातील शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. त्यातच आता मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या या बदलेल्या राजकिय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी सोबत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला असून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष, जिल्हास्तरीय यंत्रणांशी समन्वय मुख्य सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्यपूर्ण संपर्काचे निर्देश

राज्यात पावसामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीवर पूर्ण लक्ष असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क आणि समन्वय ठेवण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा झाली असून, त्यांना राज्यातील परिस्थितीबाबत सातत्यपूर्ण समन्वय ठेवण्याच्या निर्देश दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. गुरू पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज दादर …

Read More »

ठाणे जिल्ह्यात दुपटीने पाऊस, मुंबईचा पाणीप्रश्न सुटला तानसा आणि मोडक सागर धरणांच्या पाणी पातळीत वाढ

मागील दोन आठवड्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पावसाने चांगलीच हजरी लावली. तसेच या दोन आटवड्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस पडल्याचे नोंद झाली आहे.  जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात सलग दुसऱ्या आठवड्यात ही सरासरीच्या दुप्पट पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील दोन आठवड्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ६८५.३ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात …

Read More »

पुणे, नाशिक, कोकणला पुढील ४८ तासाचा इशारा; वाचा जिल्हानिहाय पाऊस स्थिती भारतीय हवामान खात्याकडून इशारा जारी

सबंध जून महिना नाराज असलेल्या पावसाने जुलै महिना उजाडताच आपली हजेरी लावण्यास सुरुवात केलेली असून त्यात अद्याप खंड पडू दिला नाही. मागील आठवड्यापासून सक्रिय मान्सूनने कोकण, पुणे, मुंबईला पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा दिलेला असतानाच विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने हजेरी लावत जून महिन्यातील तुटीचा कालावधी …

Read More »

सुप्रिया सुळे यांचा इशारा, लक्षात ठेवा १०५ मध्ये आमच्यातून गेलेले ५० आहेत… शरद पवार पाऊस कमी झाल्यानंतर शेवटच्या युवकापर्यत जाणार

निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी पवारसाहेबांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले आपले ५० आहेत हे लक्षात ठेवा असे सूचक विधानही खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. आता विरोधी पक्षाच्या …

Read More »