Breaking News

Editor

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले शिक्षणापासून ते पाणी पुरवठ्या संदर्भात “हे” निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याच्या अध्यक्षतेखालील बैठकीत

अपारंपरिक ऊर्जा निर्मिती धोरण २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा महाऊर्जाकडील नोंदणीकृत ४१८ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना कार्यान्वित करण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय ११ मे २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. या अनुषंगाने आज अपारंपरिक उर्जा निर्मिती धोरण २०२० अंतर्गत प्रोत्साहनात्मक सुधारणा करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी …

Read More »

पंतप्रधान मोदींशी बोला नाहीतर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान करू राज्यमंत्री बच्चू कडूंचा आघाडी सरकारला इशारा

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनला पाठिंबा दिलेले आणि राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे. धान आणि हरभऱ्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींशी बोलून अनुदानाची व्यवस्था करावी अन्यथा, त्याचे परिणाम राज्यसभेच्या मतदानावर दिसतील, आम्ही राज्यसभेसाठी शेवटच्या पाच …

Read More »

या जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या फीमध्ये १५ टक्के कपात प्रा वर्षा गायकवाड यांचे शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

येत्या ९ जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरु होत असतानाच २०२१ – २२ या शैक्षणिक वर्षासाठी १५ टक्के फी कपातीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांनी विभागस्तरावर शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. मुंबई, पुणे, ठाणे, रायगड, पालघर या …

Read More »

ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत म्हणाले, लवकरच प्री-पेड आणि पोस्टपेड मीटर बसविणार राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिनी स्थापना

लवकरच बसविण्यात येणारे स्मार्ट मीटर हे प्राधान्याने प्री-पेड आणि पोस्टपेड असतील. स्मार्ट मीटरच्या वापरामुळे वीज उपकंपन्यांची आर्थिक व्यवहार्यता सुनिश्चित होईल,अशी अपेक्षा आहे. स्मार्ट मीटरमुळे मनुष्यबळावरील खर्चही कमी होण्यास मदत होईल, असे नियोजन असल्याची माहिती ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली. ऊर्जा ही प्रगतीचे इंजिन आहे. या इंजिनाला गती व …

Read More »

मुख्यमंत्री पदावरून विचारले असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, नागरीकशास्त्राची जाण असेल… मी लोकसभेला तिकीट मिळावं म्हणून विनंती करणार

मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून राष्ट्रवादी काँग्रेसचाच होईल अशा पध्दतीची वक्तव्य होत आहेत. यापार्श्वभूमीवर आज चंद्रपूर दौऱ्यावर असलेल्या सुप्रिया सुळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी फारच सावध भूमिका घेत पक्षाकडून पुढील वेळीही बारामती लोकसभा मतदारसंघातून मला तिकिट मिळावे असे हात जोडून म्हणाल्या. तसेच आपल्याला नागरिक शास्त्राची जाण असेल असे सूचक …

Read More »

नूपुर शर्मा यांच्या वक्तव्याचे पडसाद, अरब देशात मोदींचा फोटो कचरा कुंडीवर संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेत केली कारवाईची मागणी

दोन तीन दिवसांपूर्वी भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक टिप्पणी केली. या टीप्पणीवरून आंतरराष्ट्रीयस्तरावर त्याचे पडसाद उमटत असून अरब राष्ट्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो कचरा कुंडीवर लावण्यात आले आहेत. तसेच मोदींच्या फोटोवर बुटाचे ठसेही उमटविण्यात आल्याने भारताबद्दल अतिशय नकारात्मक भूमिका व्यक्त करण्यात येत आहे. नूपुर …

Read More »

अमृता फडणवीस यांचे पुन्हा गाळलेल्या जागा भराचे ट्विट, शिवसेनेवर निशाणा मुंबईतील रस्त्यावरून टीका

राज्यातील आता पर्यतच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नींपेक्षा सर्वाधिक चर्चेत असलेल्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या सातत्याने समाज माध्यमावर काहीतरी लिखाण करत असतात. त्यातून बऱ्याचवेळा नव्या वादाला जन्म देतात तर कधी वाद ओढवून घेतात. तर कधी त्या राजकिय टीका टिप्पणी करून चर्चेत येतात. आज अमृता फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा निर्णय; राज्यातील नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्रासह, ३ अभयारण्य घोषित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत निर्णय

राज्यात ६९२.७४ चौ.कि.मी क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह ३ अभयारण्य घोषित करण्यास आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच औरंगाबाद शहराच्या पाणी पुरवठा योजनेसाठी जायकवाडी पक्षी अभयारण्य क्षेत्रातील बांधकामासही बैठकीत मान्यता देण्यात आली. याबाबतचा प्रस्ताव तत्काळ राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे सादर करण्याचे …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन आंदोलनाने आणि “या” पध्दतीने होणार साजरा राष्ट्रवादीचा १० जूनला २३ वा वर्धापन दिन ; राष्ट्रवादी सप्ताह आणि विविध प्रश्नांसंबंधी आंदोलने

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन १० जून रोजी साजरा करण्यात येत असून प्रत्येक घरावर राष्ट्रवादीचा झेंडा व दारावर स्टीकर आणि राष्ट्रवादी वर्धापन दिन सप्ताह व १६ जूननंतर विविध प्रश्नांवर जिल्हास्तरीय आंदोलन आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साधनांचा वापर …

Read More »

संजय राऊत म्हणाले, “त्या” वक्तव्यावरून भाजपा आखाती देशांकडे माफी मागतेय नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केल्यानंतर राऊतांची टीका

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टीप्पणी केल्यानंतर आखाती प्रदेशातील भारताबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय मालावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर भाजपाने नूपुर शर्मा यांना भाजपामधून सहा वर्षासाठी निलंबित केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, …

Read More »