Breaking News

Editor

चौकशी समितीवरून फडणवीस आणि मलिक यांचे आरोप प्रत्यारोप : नेमके काय खरे दोन्ही सरकारचे एक सदस्यीय समितीचे आदेश वाचकांसाठी

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलास चांदीवल यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समितीची स्थापना केली. हि समिती स्थापन करताना तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावरील एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी फडणवीस …

Read More »

घर खरेदीदारांसह बांधकाम क्षेत्राला मविआ सरकारने दिला दिलासा २०२१-२२ वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाही -बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी मागील वर्षभरापासून यंदाही कोरोना संकटाचा मुकाबला राज्यातील जनता करत आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक समस्येचा सामना सर्वसामान्य नागरीकांबरोबरच सरकारलाही करावा लागत असल्याने यंदाच्यावर्षीही रेडी रेकनरच्या दरात कोणतीही दर वाढ न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेत राज्यातील घर खरेदीदारांसह बांधकाम क्षेत्राला दिलासा दिल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. …

Read More »

रश्मी शुक्लांपाठोपाठ परमबीर सिंग प्रकरणावरून भाजपा बॅकफूटवर फडणवीसांच्या आरोपातील हवा गुल

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर आणि पोलिस दलातील बदल्यांप्रकरणी भाजपाने केलेल्या महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली. मात्र या दोन्ही प्रकरणात गृह विभागाने केलेले स्पष्टीकरण आणि मुंबई …

Read More »

गुन्हा का नोंदवला नाही? न्यायालयाकडून परमबीर सिंगांवर प्रश्नांची सरबती सेशन कोर्टात जाण्याचे दिले निर्देश

मुंबईः प्रतिनिधी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपण आरोप केलात. परंतु त्या संदर्भात एफआयआर का दाखल केला नाही ? अशी विचारणा करत गृहमंत्र्यांनी तुमच्यासमोर सदर १०० कोटी रूपये गोळा करण्यासंबधी विचारणा केली होती का? जर सदरची माहिती ऐकिव स्वरूपात असेल तर त्याबाबतचे पुरावे आहेत का? अशी प्रश्नांची सरबती मुंबई …

Read More »

महिलांसाठी विशाखा समितीच्या अंमलबजावणीसाठी आता टास्क फोर्स महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सर्व नोंदणीकृत आस्थापना, कारखाने, कंपनी, संघटित असंटित क्षेत्रामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ केल्याच्या घटना घडतात. या छळापासून संरक्षण व्हावे, यासाठी आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घेणे गरजेचे असून सर्व विभागांनी नियमानुसार उचित कार्यवाही करावी, असे निर्देश देऊन विशाखा समितीच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी टास्क फोर्स नेमणार असल्याचे महिला …

Read More »

निवृत्त न्यायाधीश चांदीवाल समिती करणार गृहमंत्र्यांवरील आरोपाची चौकशी सहा महिन्यात राज्य सरकारला अहवाल सादर करणार

मुंबई : प्रतिनिधी मुंबई पोलिस आयुक्त पदावरून परमबीर सिंग यांची बदली केल्यानंतर त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात शंभर कोटीची खंडणी वसुलीचा खळब‌ळजनक आरोप केला. आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपाची चौकशी कमिशन ऑफ इन्क्वायरी ऍक्ट अंतर्गत उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय समितीची …

Read More »

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्या या मागण्या बुडणाऱ्या रोजगाराची नुकसान भरपाई लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा करा

कराड : प्रतिनिधी राज्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. २०२० मध्ये आढळून आलेल्या रुग्णसंख्येपेक्षा अधिक रुग्ण दरदिवशी राज्यात सापडत आहेत. विदर्भातील अमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली कोरोनाची ही दुसरी लाट (?) मुंबई-पुण्यासह, मराठवाडा आणि राज्याच्या इतर भागात वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाउन करावे की कसे यावर प्रशासन, वैद्यकीय …

Read More »

शरद पवार ब्रीच कँडी रूग्णालयात अॅडमिट परिस्थिती बघून शस्त्रक्रियेबाबत डॉक्टर निर्णय घेतील- नवाब मलिक

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटात आज पुन्हा दुखायला लागल्याने आज त्यांना ब्रीच कँडी रूग्णालयात अॅडमिट करण्यात आले. त्यांच्यावर उद्या शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र आज पुन्हा पोटात दुखायला लागल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक …

Read More »

राज्यातील लॉकडाऊनवरून राष्ट्रवादीतच विसंवाद प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्षांकडून वेगवेगळी मते

मुंबईः प्रतिनिधी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोध करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही त्यात सूर मिसळत लॉकडाऊन लागू करण्यास विरोध दर्शविला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेगळीच भूमिका जाहिर करत लॉकडाऊनवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच विसंवाद असल्याचे चित्र आज पहिल्यांदाच …

Read More »

निर्मल नगर रहिवाशांनी विकासकाला दिली १५ दिवसाची मुदत अन्यथा मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा दिला इशारा

मुंबईः प्रतिनिधी निर्मल नगर येथील पुर्नविकास प्रकल्पात विकासकाकडून मनमानी करण्यात येत आहे. मागील ३ वर्षापासून येथील १८०० रहिवाशांना विकासकाने भाडेही दिलेले नाही. पुढील १५ दिवसात विकासक सेजल सिध्दा बिल्डरने रहिवाशांचे थकित भाडे आणि पुर्नविकासाचे काम लवकर मार्गी न लावल्यास मुंबई उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा ऑल्वीन युथ फाँऊडेशनचे संस्थापक ऑल्वीन दास …

Read More »